Tomato Crop Disease : टोमॅटो पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक

Tomato Crop Disease In Summer : उन्हाळी हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या टोमॅटो पिकावर कुकूंबर मोझाईक व्हायरस (सीएमव्ही) या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना कराव्यात.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

Shrirampur Agriculture News : उन्हाळी हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या टोमॅटो पिकावर कुकूंबर मोझाईक व्हायरस (सीएमव्ही) या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे (Agriculture Science Centre) (बाभळेश्वर) विषय विशेषज्ञ भरत दवंगे यांनी केले.

‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त कनोली (ता. संगमनेर, जि.नगर) येथील हनुमान मंदिर सभामंडप येथे ‘ॲग्रोवन’तर्फे टोमॅटो पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान याविषयी ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि.चे कृषी विद्यावेत्ता किरण कोल्हे, क्षेत्रीय व्यवस्थापक सिद्धेश मोटे, सरपंच भाऊसाहेब पवार, जयदीप ठाकरे, हरिदास कनकर, अर्जुन वर्पे, योगेश मेमाणे, सोपान वर्पे, जालिंदर वर्पे, शेखलाल शेख, दत्तू वर्पे, नामदेव वर्पे, विठोबा फापळे, राधाकिसन काकडे, वाल्मीक दिघे, अण्णा वर्पे आदी उपस्थित होते.

Crop Protection
Tomato crop protection : अवकाळीमुळे टोमॅटो पिकावर काय परिणाम होतात?

दवंगे म्हणाले की टोमॅटो पिकावर मावा, पांढरी माशी आणि फुलकिडी आदींचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या मार्फंत विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये कुकूंबर मोझाईक व्हायरस या रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होतो.

त्यामुळे सुरुवातीपासूनच पिकामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पिवळे चिकट सापळे शेतात लावणे, अझाडिरेक्टीन वर आधारित कीटकनाशकाची व लेबल क्लेमनुसार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे, एकात्मिक कीड व्यवस्थापन संकल्पनेच्या अवलंब करणे आवश्यक आहे.

तसेच टोमॅटोची सुदृढ वाढ होण्याच्या दृष्टीने संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे विविध अखाद्यपेंडीचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, संतुलित रासायनिक खते आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सेंद्रिय खतांमधून वापर करणे आवश्यक आहे.

तसेच, टोमॅटोवरील नागअळी आणि फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी फेरोमोन सापळ्यांचा वेळीच वापर करणे आवश्यक आहे. लालकोळीसारख्या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याबरोबर शिफारसीत कोळीनाशकाचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

Crop Protection
Tomato Market : शेतकऱ्यांचे पावणेदोन कोटी घेऊन टोमॅटो व्यापारी पसार

कोल्हे म्हणाले, की टोमॅटो पीक घेण्यापूर्वी जमिनीचे माती परीक्षण केले जावे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित विद्राव्य खताच्या माध्यमातून टोमॅटो पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, टोमॅटो पिकाचे संतुलित अन्नद्राव्य व्यवस्थापनाव्दारे भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

कंपनी व उत्पादनाविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲग्रोवनचे सिनियर एक्झिक्युटीव्ह सैफ शेख यांनी केले. आभार बंडू वर्पे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com