शेतकरी संघटनेचा आज सांगलीत मेळावा

कोरोना काळातील संकट, शेतमालाची नुकसान, मंदीचा फटका, नैसर्गिक आपत्ती, वाढलेला उत्पादन खर्च, वीज आदी प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे.
शेतकरी संघटनेचा आज सांगलीत मेळावा

सांगली ः साखर उद्योग (Sugar Industry) आणि जीएम (जेनेटिकली मॉडिफाइड) बियाणांचे अभ्यासक अजित नरदे (Ajit Narade) यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. २८) दुपारी २ वाजता टिळक स्मारक मंदिरमध्ये शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा (Sharad Joshi Shetkari Sanghatana) शेतकरी मेळावा होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते जयपाल फराटे (Jaypal Pharate) यांचा विशेष गौरव केला जाणार आहे.

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे -पाटील मार्गदर्शक आहेत. कोरोना काळातील संकट, शेतमालाची नुकसान, मंदीचा फटका, नैसर्गिक आपत्ती, वाढलेला उत्पादन खर्च, वीज आदी प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. जैव तंत्रज्ञानयुक्त बियाणे वापरण्यास बंदी असल्याने शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीत सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. त्यामुळे रस्त्यावरची लढाई अटळ आहे. त्याची दिशा ठरवली जाणार आहे. शेतकरी नेते संजय कोले, नवनाथ पोळ, अर्जून नरदे, अल्लाउद्दीन जमादार, राम कणसे, शीतल राजोबा, अशोक पाटील, सुभाष मदवाण्णा, मोहन परमणे, अनिल पाटील नियोजन करत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com