Pune News : वनहक्क व्यवस्थापन आराखड्याबाबत बैठक

सदर बैठक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (घोडेगाव) यांच्यवतीने आयोजित करण्यात आली होती.
Pune News
Pune NewsAgrowon

पाईट (ता. खेड) : खेड तालुक्यातील (Khed Taluka) नऊ गावातील वनहक्क प्राप्त गावांसाठी सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन आराखडे (Forest Rights Management Plan) तयार करण्यासंदर्भातील आढावा बैठक कोहिंडे खुर्द(आंबोली) येथील शासकीय आश्रम शाळेत संपन्न झाली.

सदर बैठक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (घोडेगाव) यांच्यवतीने आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, कल्पवृक्ष संस्था (पुणे) चे प्रदीप चव्हाण तसेच खेड तालुक्यातील वांद्रा, तोरणे खुर्द,खरपूड,भोमाळे,धामणगाव बुद्रुक,बहिरवाडी,कारकुडी, टोकावडे,दोंदे या नऊ वनहक्क प्राप्त गावांचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व सामूहिक वनहक्क समिती प्रतिनिधी, खेड तालुका वनहक्क कायदा रूपांतरण समिती सदस्य आणि शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गणेश गावडे व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Pune News
वनहक्क दाव्यांच्या मंजुरीची यादी प्रसिद्ध करा ः पवार

या आढावा बैठकीमध्ये सामूहिक वनहक्क प्राप्त प्रत्येक गावामध्ये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या स्थापन करणे आणि त्याअंतर्गत जल, जंगल, जमीन आणि गाव विकासाच्या वेगवेगळ्या योजनांचे विकास आराखडे तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी सुंदर लेझीम पथकाद्वारे व आदिवासी नृत्याद्वारे केले. यानंतर मान्यवरांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे बनवलेले विविध हस्तकला, चित्रकला, विज्ञानविषयक प्रदर्शन आणि विज्ञान आश्रम पाबळद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध कौशल्यविकास प्रकल्पाची पाहणी केली.

या बैठकीत खेड तालुका सामुहिक वनहक्क कायदा रूपांतरण समितीवर कल्पवृक्ष संस्थेच्या प्रदीप चव्हाण यांची तसेच ग्रामसभा प्रतिनिधी म्हणून भोमाळेच्या सुवर्णा रोशन भोमाळे आणि खरपुडच्या बाळू वामन मदगे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पी. सी.पिंपळे यांनी केले तर सूत्रसंचालन सूर्यकांत गायकवाड यांनी केले मुख्याध्यापक गणेश गावडे यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com