वादळी पावसामुळे लाखोंचे नुकसान

दोन तासांच्या पावसातच नदी-नाले, पाटचाऱ्याचे पाणी शेतांमध्ये घुसले. त्यामुळे भाजीपाला पिके पाण्यात बुडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वादळी पावसामुळे लाखोंचे नुकसान
RainAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पिंपळनेर, जि. धुळे : चिकसे (ता. साक्री) परिसरात शुक्रवारी (ता. १०) व शनिवारी (ता. ११) वादळी वाऱ्यासह पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. या वादळी पावसामुळे चिकसे शिवारातील शेडनेट, कांदा चाळ, (Onion) भाजीपाला पिकांचे (Vegetables Crop) नुकसान झाले. दोन तासांच्या पावसातच नदी-नाले, पाटचाऱ्याचे पाणी शेतांमध्ये घुसले. त्यामुळे भाजीपाला पिके पाण्यात बुडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चिकसे येथील घनश्याम कदम यांनी पंधरा दिवसांपूर्वीच शासकीय अनुदानासह २१ लाख रुपये खर्च करून शेडनेट उभारले होते; मात्र त्यात पीक घेण्यापूर्वीच वादळामुळे शेडनेट भुईसपाट झाले. कदम यांच्याच कांदा चाळीवर झाड कोसळून तीनशे क्विंटल कांदा पाण्यात भिजला. यामुळे कदम कुटुंबाचे अंदाजे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विनायक कुलकर्णी या शेतकऱ्याचे दीड एकरावरील शेडनेट वादळामुळे उखडून गेले आहे. कुलकर्णी यांच्या शेडनेटमधील वांगी पिकाची एका आठवड्यात काढणीची सुरुवात होणार होती; मात्र पावसामुळे शेडनेट उखडल्याने त्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. चिकसे देशशिरवाडे शिवारातील वैभव कदम व राहुल कदम यांचे तीन एकरावरील शेडनेट जमीनदोस्त झाले. त्यातील शिमला मिरचीचे नुकसान झाले आहे.

शेतकरी मधुकर आघाव यांच्या कांदा चाळीवरील संपूर्ण पत्रे वादळात उडून गेल्याने चाळीतील संपूर्ण दोनशे क्विंटल कांदा उघड्यावर पडला. तसेच शेतकरी शिवाजी खैरनार यांच्या कांदा चाळीवरील पत्रे उडाले व चाळीतील कांदा भिजला. संजय अहिरे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला. धनराज खैरनार, दगडू महाजन, सुरेश खैरनार, दौलत महाजन यांच्या शेतात पाणी घुसल्याने मिरची, गवार, भेंडी, कारली, कोथिंबीर या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com