Agricultural Festival : कृषी महोत्सवातून मिनी जलकुंडाचा पर्याय

कृषी विभागाने, शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत वाढावा, यासाठी फळबाग लागवडीला चालना दिली आहे. जिल्‍ह्यातील अनेक गाव-पाड्यांमध्ये जानेवारी ते मे या कालावधीत पाणीटंचाई निर्माण होते.
Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon

Alibag News : भात पिकासह फळबाग लागवडीला चालना मिळावी, यासाठी जिल्‍हा कृषी विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. पनवेलमधील जिल्हा कृषी महोत्सवात (District Agricultural Festival) मिनी जलकुंडाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.

शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. हे जलकुंड शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहे.

कृषी विभागाने, शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत वाढावा, यासाठी फळबाग लागवडीला चालना दिली आहे. जिल्‍ह्यातील अनेक गाव-पाड्यांमध्ये जानेवारी ते मे या कालावधीत पाणीटंचाई निर्माण होते.

डोंगर उतारावर कमी खर्चात व कमी जागेत पाणी साठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत फळबागेस संरक्षण देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

Agricultural Festival
अलिबाग :कांदा, वाल, मुगाचे पीक अडचणीत

सध्या पोलादपूर तालुक्‍यातील गोळवणीसह अन्य गावांत मिनी जलकुंभाचा उपक्रम सुरू केला आहे. अर्धा गुंठे क्षेत्रामध्ये १५ मीटर लांबी, १५ मीटर रुंदी व तीन मीटर खोल असलेल्‍या मिनीजल कुंड उभारता येणार आहे.

याची साठवण क्षमता साधारण ५० हजारांपेक्षा अधिक आहे. यामुळे जवळपास १०० झाडांना मुबलक पाणी मिळू शकेल.यासाठी खर्चही कमी येत असून पाण्याची जास्तीत जास्त साठवणूक जलकुंडामुळे होत असल्याने कृषी महोत्‍सवात मिनी जलकुंड सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले.

कृषी महोत्‍सवात प्रतिकृती

दक्षिण रायगडमध्ये तीस शेतकऱ्यांनी जलकुंडाची उभारणी केली आहे. यातून सुमारे तीन हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे.

जलकुंडाबाबत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती मिळावी, यासाठी कृषी महोत्सवात जलकुंडाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून त्याची माहिती सहज व सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. हे जलकुंड बघण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com