Minister Dada Bhuse : आदर्श ग्रामसेवकांच्या पाठीवर शाबासकीची थाप अन्‌ कानपिचक्या

Grampanchyat Gramsevak : ९५ टक्के ग्रामसेवक चांगले काम करणारे आहेत. मात्र, गावात न जाणारे ५ टक्के ग्रामसेवक देखील आहेत. काही ग्रामसेवक सरपंचाला धाब्यावर बसून स्वाक्षरी करून तर काहीजण कोठेतरी बसून ग्रामविकासाचा गाडा हाकतात.
Minister Dada Bhuse
Minister Dada BhuseAgrowon

Nashik News : ‘‘९५ टक्के ग्रामसेवक चांगले काम करणारे आहेत. मात्र, गावात न जाणारे ५ टक्के ग्रामसेवक देखील आहेत. काही ग्रामसेवक सरपंचाला धाब्यावर बसून स्वाक्षरी करून तर काहीजण कोठेतरी बसून ग्रामविकासाचा गाडा हाकतात.

अशा कामास दुर्लक्षित करणाऱ्या ग्रामसेवकांमुळे चांगले काम करणारे ग्रामसेवकांचे काम दुर्लक्षित होते,’’ असा टोला पालकमंत्री दादा भुसे यांनी लगावला. त्यांनी आदर्श ग्रामसेवकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांना कानपिचक्या दिल्या.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे गत पाच वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण सोमवारी (ता.८)पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल होत्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष संजीव निकम, राज्य सचिव सुचित घरत, जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, रवींद्र शेलार, अरूण आहेर, बापू आहिरे आदी उपस्थित होते.

Minister Dada Bhuse
Kisan Long March : दादा भुसे आणि अतुल सावे यांची किसान सभेच्या नेत्यांशी रात्री उशिरा चर्चा

भुसे म्हणाले, ``ग्रामसेवक हा गावपातळीवर सरकारचा महत्त्वाचा दुवा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या १५५ हून अधिक योजनांची अंमलबजावणी ग्रामसेवक करत असतात. हे काम आव्हानात्मक आहे; परंतु ग्रामसेवकांसाठी ग्रामविकासाची खूप मोठी संधी आहे.

ग्रामविकासातून भारताला महासत्ता बनवणे शक्य आहे. तसेच पिण्याचे पाणी, शिक्षण आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रीत करून आदर्श गावे उभी करावीत.``

``आगामी काळात ग्रामसेवकांनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये माॅडेल व्हिलेज संकल्पना राबवावी. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाने काम करावे,`` असे मित्तल यांनी सांगितले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते पाच ग्रामसेवकांना आदर्श पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उर्वरित ७० ग्रामसेवकांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, माध्यमिकचे प्रविण पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी मयुरी झोरे, कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे, पंकज मेतकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी नितीन पवार, राजेश वावडे, दिनेश टोपले, हेमंत कोठावदे, विश्वजीत पाटील, विलास गांगुर्डे, दीपक साळवे आदींनी परिश्रम घेतले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com