Sangli News : ‘यशवंत’च्या ‘ओटीएस’ला बाबरांचा विरोध

जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीच्या झालेल्या आजच्या बैठकीत अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडे ठराव रद्द करण्याची मागणी केली.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Sangli News: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबवलेल्या एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) मोहिमंतर्गत खासदार संजय पाटील यांच्या नागेवाडी येथील यशवंत साखर कारखान्याच्या (Yashwant Sugar Factory) ‘ओटीएस’च्या ठरावाला आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यांनी विरोध केला आहे.

जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीच्या झालेल्या आजच्या बैठकीत अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडे ठराव रद्द करण्याची मागणी केली.

दरम्यान, आमदार बाबर यांच्या विरोधानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (ता. ६) खासदार पाटील यांच्या समवेत बैठक घेणार असल्याचे अध्यक्ष श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.

Sugar Factory
Sharad Pawar Sugar: साखर कारखाना नीट चालवण्यापेक्षा नेतृत्वाचे लक्ष भलतीकडेच... शरद पवारांचा टोला

यशवंत साखर कारखाना हा खासदार श्री. पाटील यांच्या गणपती संघाने खरेदी घेतला होता. या कारखान्याकडे जिल्हा बँकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. सध्या हा कारखाना बंद आहे. कर्जाच्या वाढत्या थकबाकीमुळे कारखाना बँकेने ताब्यात घेतला आहे.

कर्जाच्या वसुलीसाठी ‘एनसीएलटी’मध्ये दावा दाखल केला आहे. दुसरीकडे आमदार बाबर यांनी कारखान्याच्या विक्रीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. बड्या कर्जांच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने ओटीएस योजना सुरू केली आहे.

‘यशवंत’च्या थकबाकीसाठी या योजनेमध्ये खासदार पाटील यांनी सहभाग नोंदवला आहे. ‘ओटीएस’अंतर्गत कारखान्यास १७ कोटी भरावे लागणार आहेत. त्यापैकी तीन कोटी रुपये भरल्याची चर्चा आहे.

Sugar Factory
Sugar Factory Election : गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत शिवशाही पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

‘यशवंत’ थकबाकीबाबत उद्या बैठक

याबाबत जिल्हा बॅंक अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांना विचारले असता ते म्हणाले, बँकेने थकबाकीपोटी जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. थकबाकीबाबात असा कोणताही प्रकार झालेला नाही. यशवंत कारखान्याच्या थकबाकीबाबत खासदार संजय पाटील यांच्याशी सोमवारी ( ता. ६) चर्चा करणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com