
SC Final Decision Shiv Sena : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Poltical Crisis)सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या (Shiv Sena Case) १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) निर्णय घ्यावा, असा निकाल दिला. त्यानंतर आज शिवसेनेच्या (ठाकरे गट) आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (narhari zirwal) यांची भेट घेतली.
न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटांच्या आमदारांनी उपाध्यक्षांकडे केली आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला आहे. सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेशात आहेत. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. त्यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या 79 पानी निकालीच्या प्रतिसह निवेदन दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे तातडीने ठाकरे गटाचे आमदारांनी आज विधान भवन येथे जाऊन हा निर्णय तातडीने घ्यावा,या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिले. अध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हे निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर अध्यक्षांनी या संदर्भात निर्णय घ्यावा अशा मागणीचे पत्र दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.