
Thane Development News : ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) माध्यमातून करोडो रुपये खर्चून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येत असते. पालिकेने यंदा नालेसफाईचे ड्रोनद्वारे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निरीक्षणात सफाईकामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दर वर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येत असते. नालेसफाई करूनदेखील पावसाळ्यात नाले भरून वाहत असल्याच्या घटना घडत असतात. आशा घटना टाळण्यासाठी ठाणे पालिकेने कंबर कसली आहे.
महापालिका हद्दीत १२५ छोटे नाले असून ५० हजार ४७१ एवढी या नाल्यांची लांबी आहे. नालेसफाईसाठी नऊ प्रभाग समितीअंतर्गत नऊ कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या असून त्यानुसार प्रत्येक ठिकाणी विविध संस्थांना ही कामे वाटून देण्यात येणार आहेत.
यासाठी ९ कोटी ९६ लाख ९७ हजार ९४२ रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
तसेच नालेसफाई कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
सफाईत हातसफाई
शहरात नालेसफाईत हातसफाई केली जाते. अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेकेदार मंडळी केवळ फार्स करून बिले उकळतात.
यावर अंकुश बसावा, यासाठी नालेसफाईसाठी जी एकत्रित रक्कम असेल ती विभागून पावसाळ्याआधी नालेसफाई करण्याबरोबरच पुन्हा चार-पाच महिन्यांनी दुबार नालेसफाई करण्यात यावी, अशी सूचना केळकर यांनी केली. ती पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.