Wild Animal : वानर, रानडुकरांचा समावेश उपद्रवी वन्य प्राण्यांत करा

स्थानिक शेतकरी यांनी वन्यप्राण्यांकडून वेगवेगळ्या पिकांना होणारा प्रादुर्भाव व वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या मालमत्तेचे नुकसान याची माहिती दिली.
Wild Animal
Wild AnimalAgrowon

Ratnagiri Wild Animal News : हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर वानर, माकड व रानडुक्कर (Wild Boar) या वन्यप्राण्यांना एक वर्षाकरिता उपद्रवी (Wild Animal Rampage) वन्य प्राण्यांच्या यादीत सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी अभ्यास गटासमोर ठेवला आहे.

वन्यप्राण्यांमुळे फळपीक नुकसानीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने बांधतिवरे (ता. दापोली) येथे भेट दिली. त्याप्रसंगी आमदार कदम बोलत होते.

राज्यात आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस आदी फळझाडे तसेच बांबू व फुलझाडे यांचा मोहर, फुलोरा, पालवी आदींचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत आहे. या प्रकरणांमध्ये भरपाई निश्चित करण्याबाबत कार्यपद्धती अस्तित्वात नाही.

त्या अनुषगांने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णयानुसार फळझाडांचा मोहर, फुलोरा, पालवीचे वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या प्रकरणात नुकसानीचे प्रमाण व मोबदला देण्याकरिता कार्यपद्धती ठरविणे, नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन केली होती.

त्या समितीने कोल्हापूर मुख्य वनसंरक्षकांच्या समन्वयाखाली अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

Wild Animal
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘पीपल्स फॉर ॲनिमल’

या अभ्यासगटाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्षेत्रीय दौरे करून माहिती घ्यावी, शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या आधारे विश्लेषण करून वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान टाळण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना याचा अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्या.

या अभ्यासगटाने ७ फेब्रुवारीला बांधतिवरे (ता. दापोली) येथील अजितकुमार लयाळ यांच्या बागायतीतील वन्यप्राण्यांकडून उपद्रव झालेल्या सुपारी, चिकू, फणस या फळझाडांची पाहणी केली.

Wild Animal
Wild Animal Attack : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना २० लाख

अभ्यासगटाने या वेळी स्थानिक शेतकऱ्यांकडून वन्यप्राणी फळझाडांना कशाप्रकारे उपद्रव करतात याची माहिती घेतली. बांधतिवरे येथील समाज मंदिरात आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अभ्यासगट आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली.

स्थानिक शेतकरी यांनी वन्यप्राण्यांकडून वेगवेगळ्या पिकांना होणारा प्रादुर्भाव व वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या मालमत्तेचे नुकसान याची माहिती दिली.

आमदार कदम म्हणाले, की हिमाचल प्रदेशाच्या धर्तीवर वानर, माकड व रानडुक्कर यांना १ वर्षाकरिता उपद्रवी प्राण्यांच्या यादीत सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव अभ्यासगटासमोर ठेवला. मुख्य वनसंरक्षक आर. एम. रमानुजन यांनी मार्गदर्शन केले.

अभ्यास गटाकडून चिपळूण, गुहागरमधील पाहणीचा संयुक्त अहवाल तीन महिन्यांत शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर शासन निर्णय घेणार आहे.

अभ्यास गटातील पदाधिकारी

शासनाने नेमलेल्या अभ्यास गटात कोल्हापूर मुख्य वनसंरक्षकांसह संबंधित विभागाचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी, चिपळूण विभागीय वन अधिकारी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. प्रकाश शिरसागर, उद्यान विद्या शाखा प्राध्यापक डॉ. योगेश परूळकर, वनविद्या प्राध्यापक डॉ. विनायक पाटील, कृषी विभाग आयुक्तांचे प्रतिनिधी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे प्रतिनिधी यांचा सामावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com