मॉन्सून अरबी समुद्रात

यंदा वेळेआधी दाखल; वेगाने वाटचाल सुरू
मॉन्सून अरबी समुद्रात
Monsoon UpdateAgrowon

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) (Monsoon) प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारी (ता. २०) मॉन्सूनने अरबी समुद्रात (Arabian Sea) प्रगती केली आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीवच्या (Maldive) दक्षिणेकडील भागात मॉन्सून दाखल झाला आहे. तर पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने (Pre-Monsoon Rain) हजेरी लावली असून, मॉन्सूनच्या आगमनाची ओढ लागली आहे.

अंदमानात मॉन्सून यंदा वेळेआधी दाखल झाला. सोमवारी (ता. १६) अंदमानात आगमन झालेल्या मॉन्सूनने वेगाने वाटचाल करत बुधवारी (ता. १८) संपूर्ण अंदमान-निकोबार बेटसमूह व्यापला. शुक्रवारी पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात मॉन्सूनने वाटचाल केली. तसेच अरबी समुद्रातूनही मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. मॉन्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.


म्यानमारच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाब क्षेत्र
म्यानमारच्या किनाऱ्यालगत असलेल्या मरतबनच्या खाडीमध्ये तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पोर्टब्लेअरपासून ७०० किलोमीटर ईशान्येकडे, तर येनगावपासून (म्यानमार) १४० किलोमीटर आग्नेयेकडे ही प्रणाली घोंघावत आहे. ईशान्येकडे सरकून जाणारी ही प्रणाली शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी म्यानमारच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला होत. या प्रणालीच्या प्रभावामुळे म्यानमार लगतच्या बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची दाटी झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com