मॉन्सून दोन दिवसांत केरळात दाखल होण्याची शक्यता

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनने अरबी समुद्रात पुढे चाल केली आहे.
मॉन्सून दोन दिवसांत केरळात दाखल होण्याची शक्यता
Monsoon UpdateAgrowon

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (Monsoon) मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनने अरबी समुद्रात (Monsson In Arabian Sea ) पुढे चाल केली आहे. शुक्रवारी (ता. २७) दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटांच्या काही भागात मॉन्सून (Monsoon Ariival) दाखल झाला आहे. दोन ते तीन दिवसांत मॉन्सून केरळमध्ये (Monsoon In Kerala) दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अंदमानात मॉन्सून यंदा वेळेआधी दाखल झालेला मॉन्सून देवभूमी केरळातही नियमित सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस आधी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. २७ मे पर्यंत मॉन्सून केरळात येण्याचा अंदाज होता. मात्र वाटचाल मंदावल्याने मॉन्सून केरळात दाखल होण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पहावी लागणार आहे.

शुक्रवारी (ता. २७) मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटांच्या काही भाग, कोमोरिन समुद्राचा आणखी काही भागात प्रगती केली आहे. तर गुरुवारी (ता. २६) श्रीलंका देशाच्या निम्म्या भाग, बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा शुक्रवारी कायम होती.

दक्षिण अरबी समुद्रात हवेच्या खालच्या थरात पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह तीव्र होत आहेत. केरळ आणि लगतच्या अरबी समुद्रात ढगांची दाटी वाढत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती झाल्याने दोन दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचे निरीक्षण करण्यात येत असून, केरळातील आगमनानंतर पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com