मूग, उडदाची लागवड का घटतेय?

शेतकऱ्यांचा तूर, कपाशी लागवडीकडे वाढता कल
Mung, Urad
Mung, UradAgrowon

पुणे : राज्यात तूरीनंतर खरीप हंगामातील महत्वाची पीके म्हणून मूग व उडदाकडे (Moong Urad) पाहिले जाते. या पिकांची लागवड मुख्य किंवा आंतरपीक (Intercrop) म्हणूनही केली जाते. परंतु मागील काही वर्षांत हमीभावापेक्षा कमी दर, उशीरा पडणारा पाऊस, पावसाचा खंड आदी कारणांमुळे दिवसेंदिवस या पिकांची पेरणी (Sowing) घटत आहे.

Mung, Urad
खानदेशात मूग उत्पादनात घट

साधारणपणे या पिकांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यांचा असतो. कमी कालावधीमध्ये येणारी व अधिक आर्थिक नफा मिळवून देणारी पिके म्हणून मूग आणि उडदाकडे पाहिले जाते. पेरणीयोग्य पाऊस पडल्यावर व जमीन वापसा स्थितीत आल्याबरोबर शक्यतो जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत या पिकांची पेरणी पूर्ण केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे उशीराने आगमन, पावसात पडणारा खंड तसेच विशेषतः ऑगस्ट महिन्यात होणारी अतिवृष्टी Heavy Rainfall याचा परिणाम मूग उडीद पिकाच्या लागवडीवर होऊ लागला आहे.

Mung, Urad
मूग, उडदावरील कीड व रोगनियंत्रण

पाऊस उशिरा झाल्यामुळे उत्पादकतेबाबत अस्पष्टता येते. जून महिन्यात लागवड झाल्यानंतर साधारणतः आगस्ट महिन्यात पीक काढणीला येते. परंतु याच काळात अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुगाची काढणी करता येत नाही. पावसामुळे परिपक्व झालेल्या शेंगा फुटतात. फुटलेल्या शेंगातील दाणे शेंगांमध्येच उगवतात. परिणामी संपूर्ण पिक वाया जाते किंवा उत्पन्न कमी मिळते. अनेक भागात पडणारा दुष्काळ, पावसाचा ताण यामुळे देखील मूग उडीद लागवडीकडे शेंतकऱ्यांचा ओढा कमी झाला आहे.

नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती कमी उत्पादन येते. अशा परिस्थितीतही या मालाला चांगला भाव मिळत नाही. मागील हंगामात केंद्र सरकारने मुगासाठी ७२७५ रुपये हमीभाव जाहिर केला होता. मात्र बाजारात दर ६५०० रुपयांच्या दरम्यान मिळाले. सरकारने केवळ खरेदीचा आव आणला. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला नाही. तर उडदालाही ६३०० रुपये हमीभाव होता. मात्र बाजारात दराने ६ हजारांचा आकडाही पार केला नाही. एकिकडे पावसाने नुकसान आणि दुसरीकडे बाजारभाव मिळत नाही. अशा कोंडीत मूग आणि उडिद उत्पादक अडकले आहेत. त्यामुळे शेतकरी या पिकांच्या पेरणीकडे पाठ फिरवत आहेत. अनेक शेतकरी घरची गरज भागविण्यापुरती पेरणी करताना दिसतात.

तर दुसरीकडे जून आणि जुलै ही उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी लागवडीची वेळ असते. या वेळेत पाऊस न झाल्यामुळे पेरणीची वेळ निघून जाते. या पिकांपेक्षा शेतकरी तूर, कोरडवाहू कपाशीकडे वळतात. कोरडवाहू कपाशीमध्ये अंतरपीक म्हणून तूर घेता येते.

Mung, Urad
सुधारित तंत्राने तूर लागवड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com