
Sharad Pawar- कांदा उत्पादनाचा खर्च आणि विक्री किंमत जुळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केली आहे.
संसदेच्या अधिवेशनात कांदाचा प्रश्न केंद्र सरकार समोर मांडणार आहे, असेही पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात कांदा उत्पादक शेतकरी दर कोसळल्याने हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी नाफेडची खरेदी सुरू करण्याची मागणी करत आहेत.
तसेच आर्थिक मदतीची मागणी करत आहे. मागील चार पाच दिवस राज्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
पवार म्हणाले, "शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यामुळे अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारने करावी आणि राज्य आणि केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा मोठा कार्यक्रम राबवला पाहिजे.
कुठल्याही प्रकारचे बंधन कांदा निर्यातीला ठेऊ नये."
राज्यात नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू नसल्याचे तक्रार शेतकऱ्यांची तक्रार आहे.
"कांद्याची नाफेड खरेदी करतच नाही. काही ठिकाणी तसे प्रयत्न केल्याचे ऐकले आहे.
परंतु त्याचा बाजारावर काहीही परिणाम नाही. नाफेड शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार असेल तर किमान १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला पाहिजे.
अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, अशी आग्रही मागणी पवारांनी केली."
"शेजारच्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश राज्य सरकारने तिथल्या शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला आहे. परंतु राज्य सरकार नुसती चर्चाच करत आहे.
कांदा राज्यातील जिरायत शेतकऱ्याचे पीक आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत," असेही पवार म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.