Nagar Zilha Parishad Recruitment : नगर जिल्हा परिषद करणार ९५० पदांची भरती

Zilha Parishad : नगर जिल्हा परिषदेतील पदभरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे.
Zilha Parishad
Zilha ParishadAgrowon

Nagar News : नगर जिल्हा परिषदेतील पदभरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. नाशिक विभागीय महसूल आयुक्तांनी रोस्टरला मान्यता दिल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल साडेनऊशे पदांची ही जम्बो भरती असेल. येत्या पंधरा दिवसांत त्यासाठीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत कोणतीच भरती झालेली नाही. भरतीसाठी निघालेली जाहिरात किंवा ती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलली गेली. त्यामुळे उमेदवारांचे या भरतीकडे डोळे लागले होते. ती प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे.

जून महिन्यात या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते, असे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोविड महामारीमुळे राज्य सरकारने सर्व विभागातील भरतीवर निर्बंध आणले होते.

Zilha Parishad
Nanded Zilha Parishad : सार्वत्रिक बदली प्रक्रियेत ११५ दिव्‍यांग कर्मचाऱ्यांना सूट

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने पेसासह रिक्त जागांची बिंदूनामावली विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडून तपासून घेतली. जिल्हा परिषदेकडे एक हजाराच्या घरात जागा आहेत. ९५० जागा असल्याचे समजते. कनिष्ठ सहायकांच्या जागा कमी-जास्त होऊ शकतात. या महाभरतीची प्रक्रिया पारदर्शी केली जाणार आहे.

ग्रामविकास विभागाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य पातळीवर आयबीपीएस ही कंपनी नेमली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया होईल.

...अशी होईल भरती

जिल्हा परिषदेमार्फत केली जाणारी ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाईल. ही सर्व पदे वर्ग तीनची आहेत. या पदांसाठी जाहिरात काढली जाईल. त्यात अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची थेट संबंधित पदांवर निवड होईल. महाराष्ट्रात सर्वाधिक पदे ही नगर जिल्हा परिषदेत भरली जाणार आहेत.

...ही आहेत पदे

वरिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता, पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक (पुरुष-महिला)

Zilha Parishad
Agriculture Mechanization : नगर जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांना शेती अवजारांचा लाभ
जिल्हा परिषद प्रशासनाचा भरतीसाठीचा होम वर्क झाला आहे. राज्यात नगरमध्येच सर्वाधिक पदांची भरती होत आहे. यासाठी शासनाने करार केलेल्या संस्थेला याबाबत माहिती कळवली आहे. शासनाकडून परवानगी आल्यानंतर पंधरवड्यात भरतीची जाहिरात निघू शकेल.
आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com