Chandrabhaga River : ‘नमामि चंद्रभागा’ योजनेला गती देणार : मंत्री मुनगंटीवार

पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागा स्नान ही वारकऱ्यांसाठी पर्वणी असते.
Chandrabhaga River
Chandrabhaga RiverAgrowon

Pandharpur News : आध्यात्मिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी चंद्रभागा नदी स्वच्छ व निर्मळ होणे गरजेचे आहे, यासाठी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यात नमामि चंद्रभागा अभियान (Namami Chandrabhaga Abhiyan) सुरू करण्यात आले होते.

या अभियानाला आता गती देण्यात येणार असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी येथे सांगितले.

आर्यवैश्य समाज आयोजित परमात्मा श्री विठ्ठल- रुक्मिणी व वेदांत केसरी ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी खासदार संजय जाधव, आमदार मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, किसन महाराज साखरे, जयवंत महाराज बोधले, नंदकुमार गादेवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrabhaga River
Government Fund : सोलापूर- पंढरपूर मार्गासाठी २० कोटी रुपयांचा निधी

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, की पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागा स्नान ही वारकऱ्यांसाठी पर्वणी असते.

चंद्रभागेचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तिच्या उगमापासून पुढे संगमापर्यंत नदीपात्र आणि नदी काठ स्वच्छ राहावा, सांडपाणी थेट नदीत जाऊ नये यादृष्टीने कामे केली जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

तसेच गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांचे जन्मस्थळ असलेल्या सोनपेठ (जि. परभणी) या ठिकाणचा विकास करण्यासाठी तत्काळ आराखडा तयार करावा, असे त्यांनी या वेळी सांगितले.

तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी श्री संत साधू महाराज सेवा समिती मठास भेट देऊन मठात भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com