Vanrai Bandhara
Vanrai BandharaAgrowon

Water Bunds : वनराई बंधारेनिर्मितीत नाशिक विभाग राज्यात प्रथम

वनराई बंधाऱ्याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य यांसारखी पिके घेण्यासाठी मदत होते.

Nashik News : पारंपरिक पद्धतीने पाणी अडवून पाण्याचा साठा (Water Stock) करून बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी पुरविणे खूप गरजेचे असून त्यासाठी वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे.

नाशिक विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे (Vanrai Bunds) बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून ६ हजार १३४ बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.

या बंधाऱ्यांच्या माध्यमातून विभागात एकूण १,२२७ टीसीएम जलसाठा अडविला असून १२ हजार २६८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे. राज्यात नाशिक कृषी विभाग प्रथम असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.

Vanrai Bandhara
Vanrai Barrage : कृषी विभाग, शेतकऱ्यांच्या श्रमदानातून टाकळीत बंधारा

वनराई बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, गुरांना पिण्याकरिता, कपडे धुण्याकरिता, वनराई बंधाऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता होतो.

तसेच वनराई बंधाऱ्याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य यांसारखी पिके घेण्यासाठी मदत होते.

एका वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून सरसरी २ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे.

Vanrai Bandhara
Water Conservation : नागपुरातील ३७ गावांत ६९ वनराई बंधाऱ्यांची साखळी

नाशिक कृषी विभाग आघाडीवर

विभागात २१ फेब्रुवारीअखेर नाशिकमध्ये ३ हजार ७५५, धुळे ६०८, नंदूरबार १ हजार ३४०, जळगाव ४३१ असे एकूण ६ हजार १३४ वनराई बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहे.

राज्यात नाशिक कृषी विभागाने सर्वांत जास्त वनराई बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून व लोकसहभातून पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, असे वाघ यांनी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com