National Conference : ग्रामीण उपजीविका संवर्धनासाठी परभणीत आजपासून राष्ट्रीय परिषद

आज (ता. २३) सकाळी साडे नऊ वाजता या परिषदेचे उद्‍घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय सभागृहामध्ये होईल.
Parbhani News
Parbhani NewsAgrowon

National Conference: ग्रामीण उपजीविका संवर्धनासाठी ‘पशू आनुवंशिक संसाधनांचे व्यवस्थापन’ या विषयावरील २० वी राष्ट्रीय परिषद (National Conference) आज (ता. २३) आणि उद्या (ता. २४) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. देशमुख यांनी दिली.

नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील पशुवैद्यकीय पशुअनुवंश व पैदासशास्त्र विभाग आणि पाळीव प्राण्यांची जैवविविधता संवर्धन सोसायटी यांनी ही परिषद आयोजित केली आहे.

Parbhani News
Sugarcane Conference : बामणीत १२ मार्चला ऊस विकास परिषद

आज (ता. २३) सकाळी साडे नऊ वाजता या परिषदेचे उद्‍घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय सभागृहामध्ये होईल.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. एस. व्ही. उपाध्ये राहतील. पुणे येथील ‘बायएफ’चे समूह उपाध्यक्ष डॉ. ए. बी. पांडे प्रमुख पाहुणे असतील.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. ए. यू. भिकाने, निम्न शिक्षण अधिष्ठाता डॉ. एस. के. सहातपुरे, पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. देशमुख, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. भगवान सटाले, चितळे डेअरीचे विश्‍वास चितळे, आयोजक सचिव डॉ. पी. व्ही. नांदेडकर, डॉ. बी. पी. मिश्रा, डॉ. ए. के. मिश्रा आदी उपस्थित राहतील.

सहा तांत्रिक सत्रांत देशभरातील संशोधक, प्राध्यापक संशोधन लेख, शोध निबंध यांचे सादरीकरण करतील.

वर्णन नसलेल्या आणि नवीन मान्यता प्राप्त जाती, पशुधन प्रजनन धोरण, प्रगतिशील दुग्ध व्यावसायिक शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र, तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम होतील.

परिषदेत देशभरातील २५० हून अधिक प्राध्यापक, नामांकित संशोधन संस्था व विद्यापीठातील संशोधक, राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com