Pune News : गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात (Modern College) बायोस्फिअर्स व वनस्पती शास्त्र विभागातर्फे तणहोळी हरित चळवळीअंतर्गत सोमवारी (ता. ६) होळी साजरी करण्यात आली.
या वेळी रातमारी (टणटणी), उंदीरमारी, कॉसमॉस, हिप्टीस, गाजर गवत, चिमुक काटा, तिलपिया मासा, गप्पी मासा, मॅक्सिकन भुंगा प्रातिनिधिक चित्रांचे दहन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) भूगोल विभागाचे माजी प्रमुख डॉ. रवींद्र जायभाये, सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, ॲड. विठ्ठल देवखिळे, गिरीश अवधीत गोखले, समन्वय डॉ. प्राची क्षीरसागर, शास्त्र विभागाच्या उपप्राचार्य प्रा. स्वाती कंधारकर, प्रा. सुरेश तोडकर, डॉ. प्रकाश दीक्षित उपस्थित होते.
डॉ. लावरे म्हणाले, ‘‘बायोस्फिअर्सतर्फे गेल्या सात वर्षांपासून १८ राज्यांत ही होळी साजरी करण्यात येते. महाविद्यालयात २०१६ पासून हा उपक्रम चालू आहे. तण हे (उपद्रवी) वनस्पती आहेत. काही तणे देशी, तर काही विदेशी असतात.
यापैकी विदेशी किंवा अगांतुक तणे ही स्थानिक जैव विविधतेसाठी हानिकारक असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक वनस्पतींचा ऱ्हास होतो. साधारणपणे जल तणे, शेत तणे, वन तणे ही सर्वच हानिकारक आहेत.
विदेशी प्राणी, कोरोना व्हायरस, चिपली मासा हे ही उपद्रवी आहेत. उपद्रवी मासे किटक याच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. ट्रीज कॉन्झरव्हेटिव्ह ॲक्टमधून उपद्रवी झाडांना वगळणे आवश्यक आहे. यासाठी कायद्यात बदल होणे गरजेचे आहे.’’
डॉ. पुणेकर म्हणाले, ‘‘होळीनिमित्त विद्यार्थ्यांना या सर्व वनस्पती बघता आल्या. जलपर्णी, पिवळा धोत्रा, जलकुंभी, बेशरम ही परदेशी जलतणे आहेत. यामुळे डास वाढतात, जलप्रदूषण होते.
धनुरा, हरळी, लव्हाळा, ओसाडी या तणांमुळे पिकांचे नुकसान होते. देशी झाडे- पांगारा, बाभूळ, निंब अशी देशी झाडे वाढवायला पाहिजेत.’’
डॉ, खरात म्हणाले, ‘‘परदेशी तणांमुळे वनस्पतीचे जीवन धोक्यात आले आहे. तसेच पाण्यातील माशांचेही जीवन धोक्यात आहे. यासाठी आम्ही २० व २१ मार्च रोजी महाविद्यालय कॉन्फरन्स घेत असून, पर्यावरण जागृतीसाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.