Cotton : या कापसापासून बनवलेल्या कापडाला आग लागत नाही

अमेरिकन शास्त्रज्ञांचे संशोधन; कोणत्याही रसायनाशिवाय आगरोधक कपड्यांची निर्मिती शक्य
Cotton
CottonAgrowon

आगीपासून (Fire) बचावासाठी साधारणतः विविध रसायनांची मिश्रणे लावून आगरोधक कपड्यांची निर्मिती केली जाते. त्याऐवजी आगीपासून स्वतःचा बचाव करणाऱ्या कापसाचे (Cotton) चार वाण अमेरिकन कृषी विभागाच्या संशोधन सेवेतील शास्त्रज्ञांनी (Research Service of the US Department of Agriculture) विकसित केल्या आहेत.

या कापसापासून बनवलेले कापड कोणत्याही रसायनांच्या लेपाशिवाय स्वतःचा आगीपासून बचाव करू शकते. हे संशोधन ‘प्लॉस वन’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

पंच महाभूतामधील आग (वणवे), वारे (वादळे, चक्रीवादळे) (Cyclone, Storm) , पाणी (पूर) (Flood) योग्य प्रमाणात असताना पोषक ठरतात. मात्र त्यांचे प्रमाण आवाक्याबाहेर गेल्यास त्यातून वणवे, वादळे, चक्रीवादळे, पूर अशा अनेक आपत्ती निर्माण होतात.

त्यांच्यापासून वाचण्यासाठी बचाव करण्यासाठी माणूस प्राचीन काळापासून प्रयत्न करत आला आहे. सामान्यतः पारंपरिक कापसापासून बनवलेले कापड जेव्हा आगीच्या संपर्कात येते, त्या वेळी काही क्षणात जळून खाक होते.

मात्र आगींच्या ज्वाळांमध्ये नव्याने विकसित केलेल्या जातींच्या कापसापासून बनवलेले कापड चांगल्या प्रकारे तग धरू शकते. त्याविषयी माहिती देताना ओरलॅन्स येथील ‘एआरएस’ च्या ‘कॉटन केमिस्ट्री अॅण्ड युटिलायझेशन रिसर्च युनिट’ मधील निवृत्त शास्त्रज्ञ ब्रायन कोन्डोन यांनी सांगितले, की या नव्या जातींमुळे कॉटनच्या कपड्यांमध्ये आगीपासून सुरक्षिततेचे गुणधर्म येणार आहेत.

या नव्याने विकसित जातींची व्यावसायिक पातळीवर लागवड करणे शक्य झाल्यास रासायनिक आगी प्रतिबंधक घटकांचे प्रमाण कमी करणे शक्य होणार आहे.

कारण हे घटक पर्यावरणावर विपरीत परिणाम करणारे ठरत आहेत. या जाती शेतकरी, कापड उत्पादक आणि ग्राहक या सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणणे अशा आगप्रतिबंधक कपड्यांच्या निर्मितीचा खर्चही कमी होऊ शकेल.

Cotton
Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकरी उरतले रस्त्यावर!

अशी होती संशोधनाची पद्धत ः

सामान्यतः कापसापासून तयार झालेले तंतू किंवा धागे हे त्वरित आग पकडणारे असतात. त्यामुळे अशा धाग्यापासून बनवलेले कापडही त्वरित आग पकडते.

त्यांचा व ते वापरणाऱ्या व्यक्तींचा आगीपासून बचाव व्हावा, या उद्देशाने संरक्षणात्मक कपडे तयार करताना या कापडामध्ये आग प्रतिबंधक किंवा आगीला मंद करणारी रसायने वापरली जातात.

उदा. महागड्या जाजम, गाद्या गिरद्यांतील कापूस, आच्छादने इ. मध्ये अशा कापसाचा वापर केला जातो.

वेगवेगळ्या मूळ जातीपासून पैदास पद्धतीद्वारे नैसर्गिक जनुकांच्या एकमेकातील समन्वयातून आगरोधक गुणधर्म नव्या जातीमध्ये विकसित करण्यात आले आहेत.

या संशोधनामध्ये मिसिसिपी येथील ‘एआरएस’ च्या ‘जेनेटिक्स अॅण्ड सस्टेनेबल अॅग्रीकल्चर रिसर्च युनिट’ मधील शास्त्रज्ञ डॉ. जॉह्नी जेन्किन्स आणि जॅक सी. मॅकार्टी यांचा समावेश होता.

त्यांनी कपाशीतील वेगवेगळ्या गुणधर्मासाठी कारणीभूत जनुकांची ओळख पटविण्याचे काम केले. उदा. उत्पादन, कीड प्रतिकारकता, तंतू किंवा धाग्यांचा दर्जा (लांबी, ताकद आणि तलमपणा इ.)

त्याविषयी माहिती देताना जेन्किन्स यांनी सांगितले, की कपाशी उत्पादनासोबतच अंतिम उत्पादनापर्यंत (डर्ट टू शर्ट) प्रत्येक टप्प्यावर आवश्यक गुणधर्मांसाठी जी जनुकीय विविधता आवश्यक असते.

त्याबाबत आमच्या गटाने काम केले. कारण हे उत्पादन आधीच्या आगरोधक कपड्यांप्रमाणे केवळ प्रयोगशाळेत तयार होणार नव्हते, तर प्रत्यक्ष शेतामध्ये वाढणार होते. त्यातील गुणधर्मही संपूर्णपणे नैसर्गिक जनुकांच्या साह्याने विकसित करण्यावर आमचा भर होता.

सोबत शेतातील व्यवस्थापन पद्धत, धाग्यांचा दर्जा व त्याचे गुणधर्म, प्रत्यक्षामध्ये जी व्यक्ती ते कपडे वापरणार आहे, त्यांना मिळणारा त्या कपड्यांचा अनुभव अशा अनेक बाबींचा सातत्याने विचार करण्यात आला.

कारण जो व्यक्ती कापूस पिकवणार आहे, किंवा त्याचे कपडे अंगावर घालणार आहे, अशा दोघांनाही समाधान मिळाल्याशिवाय कोणतीही जात यशस्वी होत नाही.

नैसर्गिकता हीच मोठी उपलब्धी ः

या पैदास प्रक्रियेमध्ये वापरलेल्या सर्व मूळ कपाशी जाती या आग पकडणाऱ्या धाग्यांची निर्मिती करणाऱ्या असल्या तरी त्यातील एकही जनुक पैदास प्रक्रियेत पुढील पिढीमध्ये येणार नाही, यावर भर देण्यात आला.

त्याऐवजी एकापेक्षा अधिक जनुकांची संघशक्ती किंवा समन्वयातून लक्षणीयरित्या कमी उष्णता उत्सर्जन करण्याची क्षमता असलेले धागे तयार करण्यात आले.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कृषी विषयक गुणधर्म ( पिकाचे उत्पादन, कीडरोग प्रतिकारकता इ.) आणि धाग्यांचा दर्जा या बाबतही या नव्या जाती तितक्याच कसोटीवर उतरणाऱ्या असल्याचा विश्वास शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Cotton
Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस ७००० ते ८४५० रुपये

ब्रायन कोन्डोन म्हणाले की, धाग्याचा दर्जा आणि अंतिम कापड उत्पादनामध्ये कपडे चुरगळणार नाहीत, इस्त्री केल्याप्रमाणे दिसतील आणि त्याच वेळी त्यामध्ये आगरोधक गुणधर्मही असतील, यासाठी आमचा प्रयत्न होता.

यासाठी कार्य करणारी कपाशीतील वैशिष्ट्यपूर्ण आणि नैसर्गिक जनुकीय यंत्रणा शोधून काढणे हीच बाब आमची उपलब्धी आहे, असे म्हणता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com