FPC Mahaparishad : ‘मार्केट’ मिळवण्यासाठी एकत्र येण्याची गरज

शेतकरी कंपन्यांनी वाटचाल करताना आपापल्या भागातील शेतीमालावर काम करण्याची गरज आहे. चांगले ‘मार्केट’, चांगला दर ही मुख्य अडचण आहे.
Dr. Bhagyashri Tilekar
Dr. Bhagyashri TilekarAgrowon

पुणे : शेतकरी कंपन्यांनी (Farmer Producer Company) वाटचाल करताना आपापल्या भागातील शेतीमालावर (agriculture Produce) काम करण्याची गरज आहे. चांगले ‘मार्केट’, चांगला दर ही मुख्य अडचण आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले तरच आपल्या कंपन्याची वाटचाल योग्य दिशेने होईल असे एकमत चर्चासत्रातील व्याख्यात्यांमध्ये दिसून आले. (Agrowon FPC Mahaparishad)

Dr. Bhagyashri Tilekar
FPC Mahaparishad : शेतकरी कंपन्या सहकाराचे नवे मॉडेल

चौथ्या चर्चासत्रात बोलताना पृथाशक्ती शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा डॉ. भाग्यश्री टिळेकर म्हणाल्या, की ॲग्रोवनने महापरिषदेचे आयोजन केल्यामुळे शेतकरी कंपन्यांना एक प्रकारची पर्वणीच मिळाली आहे. आज शेतीत महिलांचा वाटा ८० टक्के आहे. शेतकरी कंपन्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही काम केले. राज्यात विविध ठिकाणी भेटी देऊन महिलांचे संघटन केले.

Dr. Bhagyashri Tilekar
FPC Mahaparishad : आधुनिक तंत्रज्ञानासह खतांचा संतुलित वापर फायदेशीर

कामे करताना आव्हाने समजली. महिलांना काम करण्याची इच्छा असते. परंतु त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. आम्ही प्रोत्साहन देऊन त्यांना कंपनीच्या माध्यमातून पुढे आणले. कंपनी तयार करताना पॅन कार्ड, आधार कार्ड लागते हे काही महिलांना माहिती नव्हते. त्यामुळे आम्हाला कंपनी तयार करताना अनेक अडचणी आल्या. सर्व आव्हाने पेलून आम्ही कंपनी स्थापन केली. कंपनीच्या माध्यमातून कांदा, हरभरा खरेदी केला. त्यासाठी नाफेडने चांगली मदत केली. ‘पृथाशक्ती’ला आसामधील दोन कंपन्या जोडल्या आहेत.

भविष्यात महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र तयार करण्याचे ध्येय आहे. आपल्या कंपन्यातील महिंलासह अन्य जिल्ह्यांतील महिलांना चांगले मार्केट उपलब्ध करून दिले, तर नक्कीच महिला कंपन्या पुढे जातील. सह्याद्री बालाघाट शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक इरफान शेख म्हणाले की आपल्या भागात मार्केट आणि दर या मुख्य समस्या आहेत. हे प्रश्‍न सोडवायचे तर शेतमाला गुणवत्तेवर काम केले पाहिजे. म्हणून आम्ही बीड जिल्ह्यात कापूस, सीताफळ, रेशीम शेती, उस्मानाबादी शेळी या विषयांवर काम करण्याचे ठरवले.कमी पाण्यातील पिके निवडण्यावर भर दिला. दुसऱ्यांवर जबाबदारी न देता स्वतःहून पुढे येऊन काम केले पाहिजे म्हणून पुढाकार घेतला. राज्यभर एकत्र येऊन मूल्यसाखळी वाढविण्यासाठी सर्वांना एकत्रित यावे लागेल. त्यातून उद्दिष्ट साध्य करता येईल. शेतमालाला अधिकचा दर मिळवण्याचा आमाच प्रयत्न आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com