Manvat Market Committee Election : मानवत बाजार समितीचा नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर

APMC Election Update : परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार संचालक मंडळाच्या १८ जागांच्या निवडणुकीचा नवीन (सुधारित) निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने गुरुवारी (ता. ४) जाहीर केला आहे.
Agriculture Produce Market Committee
Agriculture Produce Market CommitteeAgrowon

Market Committee Election In Parbhani : परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार संचालक मंडळाच्या १८ जागांच्या निवडणुकीचा नवीन (सुधारित) निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने गुरुवारी (ता. ४) जाहीर केला आहे.

त्यानुसार सोमवार (ता. ८) ते शुक्रवार (ता. १२) या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. मंगळवार (ता. १६) ते मंगळवार (ता. ३०) उमेदवारी मागे घेता येईल. ता. १० जून रोजी मतदान आणि मतमोजणी होईल अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी यापूर्वीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २१ एप्रिल रोजी निवडणूक लढविणाऱ्या ५१ अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करावयाची होती.

परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी सहकारी संस्था मतदार संघातील उमेदवार रावसाहेब कदम (रा. मंगरूळ, ता. मानवत) यांच्या आकस्मिक निधन झाले. त्यामुळे अन्य दोन उमेदवारांनी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली होती.

Agriculture Produce Market Committee
APMC Tax : बाजार समित्यांची शिवार खरेदीवर शुल्क आकारणी

त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी जे. एल. पाठक यांनी रविवारी (ता. २३) काढलेल्या आदेशाद्वारे २८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेस स्थगिती दिली होती. (नवीन) निवडणूक कार्यक्रम गुरुवारी (ता. ४) जाहीर केला आहे.

त्यानुसार १८ जागांसाठी सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सोमवार (ता. ८) ते शुक्रवार (ता. १२) या कालावधीत सकाळी ११ ते ५ या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. सोमवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी केली जाईल.

मंगळवारी (ता.१६) वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध केली जाईल. मंगळवार (ता. १६) ते मंगळवार (ता. ३०) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील.

बुधवारी (ता. ३१) निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ता. १० जून रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान घेण्यात येईल, तसेच दुपारी ४ वाजता मतमोजणी सुरू होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com