Sahyadri Farms : नशीब स्वत:चे घडवित नेई ‘कर्ता शेतकरी’

सह्याद्री फार्म्स व आयपीएच यांच्या युट्यूब चॅनेलवर ही मालिका सगळ्यांसाठी खुली आहे. दर आठवड्याला या मालिकेचे दोन भाग प्रसारित केले जाणार आहेत.
Farmer
FarmerAgrowon

Nashik News : ‘नको गुलामी, नको चाकरी; विज्ञानातून पिके भाकरी, नशीब स्वत:चे घडवित नेई कर्ता शेतकरी’ या शीर्षक गीतामधूनच ‘कर्ता शेतकरी’ या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट होतो.

शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्स (Sahyadri Farms) व मनोविकास क्षेत्रात काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता रूजावी, म्हणून ‘कर्ता शेतकरी : अभ्यास मनाचा, प्रवास उद्योजकतेचा’ या संकल्पनेची निर्मिती केली आहे.

मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी व शेतकरी असलेला नाटक, चित्रपट कलाकार राजकुमार तांगडे यांचा सहभाग असलेली ही संवाद मालिका आहे. या उपक्रमाअंतर्गत ४२ भागांची ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून हा संवाद समजून घेता येणार आहे.

मन म्हणजे काय, विचार-भावना वर्तनांचा एकामेकांशी असलेला संबंध, विचारांची जाण व भान, माझा मूळ स्वभाव कोणता, निंदा कशी स्वीकारायची, योग्य निर्णय कसे घ्यायचे व निर्णयांची अंमलबजावणी कशी करायची, अशा अनेक संकल्पनेभोवती ही मालिका गुंफलेली आहे.

Farmer
Mango Crop Management : शेतकरी नियोजन पीक: हापूस आंबा

सह्याद्री फार्म्स व आयपीएच यांच्या युट्यूब चॅनेलवर ही मालिका सगळ्यांसाठी खुली आहे. दर आठवड्याला या मालिकेचे दोन भाग प्रसारित केले जाणार आहेत.

ही संवाद मालिका कुटुंबातील सर्वच सदस्यांनी पाहणे तसेच समाज माध्यमांवरून आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही मालिका पोहोचवावी, असे आवाहन सह्याद्री फार्म्स व आयपीएच यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात रोज काहीना काही प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे शेतकरी कोलमडून पडतो. त्याच्या मनाला उभारी देणारे, दिशा देणारे काहीच नसते. या सगळ्या परिस्थितीत तो उभा राहावा, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन त्याच्यामध्ये उद्योजकीय मानसिकता तयार व्हावी, या उद्देशाने सुरू केलेली ही मालिका शेतकऱ्यांना जगण्याचे बळ देणार आहे.
विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ‘सह्याद्री फार्म्स'

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com