MPSC : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू

पुण्यात मागील चार दिवसांपासून स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन पुकारले होते.
MPSC
MPSCAgrowon

MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती एमपीएससी आयोगाने ट्वि्टद्वारे (ता.२३) रोजी दिली आहे.

या अभ्यासक्रमाच्या मागणीसाठी पुण्यात मागील चार दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनाला गुरुवारी (ता.२३) यश मिळाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे."

MPSC
MPSC Exam : जो सर्वोत्तम, तोच स्पर्धेत टिकेल

पुण्यात मागील चार दिवसांपासून स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन पुकारले होते. तसेच जोपर्यंत अभ्यासक्रमात बदल होत नाही तोवर आंदोलन सुरु राहणार असा पावित्रा आंदोलकांनी घेतला होता.

या आंदोलनाला भाजपसह, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या होत्या. त्यामुळे या प्रश्नाला राजकीय वळण मिळाल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती.

दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आंदोलनाला भेट देत विद्यार्थ्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक करुन देण्याचे आश्वासन दिले होते.

ही भेट गुरुवारी (ता.२३) होणार होती. परंतु मुख्यमंत्री शिंदे काही कामानिमित्त बाहेर असल्याने ही भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्री आणि विद्यार्थ्यांची बैठक होण्यापूर्वीच आयोगाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेतला आहे.

त्यामुळे राज्यातील एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, " लोकसेवा आयोग स्वायत्त आहे. परंतु विद्यार्थ्यांची अभ्यासाची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने आयोगाला विनंती केली. ती आयोगाने स्वीकारली आहे."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com