
Ratnagiri News : जागतिक महिलादिनानिमित्त जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा (Water Supply) योजनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गटांकडे (Women's self-help group) देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने (Zilha Parishad) घेतला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर निवोशी (ता. लांजा) येथील योजना क्रांती उत्पादक महिला बचत गटाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या इतिहासातील असा पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सांगितले. जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रतिदिन दरडोई किमान ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे. पाण्याचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे.
सध्या जिल्ह्यात ‘हर घर नलसे जल’ हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. जलजीवनमधून जिल्ह्यात ७०० कोटी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत ५६ गावे ‘हर घर नलसे नल’ म्हणून जाहीर करण्यासाठी सज्ज आहेत.
स्वच्छ सुजल शक्ती सन्मान योजनेअंतर्गत इंदवटी महसुली गावांतील निवोशी (ता. लांजा) गाव ‘हर घर नलसे जल’ म्हणून सरपंच विनोद गुरव यांनी विशेष ग्रामसभेत घोषित केले आहे.
या गावातील योजना क्रांती उत्पादक महिला बचत गटाकडे पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी बचत गटाने स्वयंप्रेरणेने स्वीकारली आहे.
महाराष्ट्र जीवनोन्नती (उमेद) अभियानातून या बचत गटांची नोंदणी झाली आहे. या गटात १७ महिला कार्यरत आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, प्रकल्प संचालक एन. डी. घाणेकर, प्रकल्प संचालक राहुल देसाई, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
बचत गटांच्या कामांबाबत ठराव
बचत गटाने योजनेची १०० टक्के पाणीपट्टी वसूल करणे, स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करणे, नियमित पाण्याची माहिती देणे, रासायनिक व जैविक तपासणी करणे, किरकोळ दुरुस्ती ही कुशल-अकुशल मनुष्यबळाकडून करवून घेणे यासारखी कामे करण्याबाबतचा ठराव करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.