Soybean In Diet : सोयाबीन हे केवळ तेलबिया पीक नव्हे तर ते एक पौष्टिक खाद्यान्न

बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून दर्जेदार सोयाबीन तसेच कमी कालावधीत परिपक्‍व होणाऱ्या वाणांचा प्रसाराला प्रोत्साहन मिळेल, असे सांगत सोयाबीन यापूर्वी केवळ तेलवर्गीय पीक होते.
Soybean
SoybeanAgrowon

Nagpur News : बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून दर्जेदार सोयाबीन (Soybean) तसेच कमी कालावधीत परिपक्‍व होणाऱ्या वाणांचा (Soybean Verity) प्रसाराला प्रोत्साहन मिळेल, असे सांगत सोयाबीन (Soybean) यापूर्वी केवळ तेलवर्गीय पीक होते.

परंतु यातील पौष्टिक घटकांचा विचार करता हे येत्या काळात चांगले खाद्यान्न म्हणून नावारूपास येईल, असा विश्‍वास भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के. एच. सिंह यांनी व्यक्‍त केला.

इंदूर (मध्य प्रदेश) येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या वतीने सोयाबीनचे बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. सिंग म्हणाले, ‘‘नजीकच्या काळात वातावरणात सातत्याने होणारे बदल अनाकलनीय आहेत. वातावरणातील बदलाच्या या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रतिकूलस्थितीत तग धरणारे वाण विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

Soybean
Soybean Market : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज युएसडीएनं घटवला

खरीप हंगामात सोयाबीन लागवडीवर शेतकरी भर देतात. गेल्या काही वर्षांत मॉन्सूनच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड पडतो. त्यानंतर पीक फुलावर असताना किंवा काढणीच्यावेळी पावसाची संततधार राहते.

ही बाब लक्षात घेता कमी कालावधीत परिपक्‍व होणाऱ्या वाणांच्या लागवडीवर येत्या काळात भर द्यावा लागणार आहे. कमी आणि मध्यम अशा दोन वाणांचाच पर्याय शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीत निवडावा. त्यामुळे अनिश्‍चित पर्जन्यमानाच्या काळात पिकाला जपता येणार आहे.

त्याकरिता बीजोत्पादक शेतकऱ्यांनी अशाच वाणांचा पर्याय शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात उपलब्ध करून दिला पाहिजे. मध्य प्रदेशातील निमाड भागात सिंचनाच्या सोयी आहेत. त्यामुळे या परिसरात रब्बी हंगामात बीजोत्पादनाला प्रोत्साहन देणे शक्‍य आहे.

सोयाबीन बीजोत्पादन विभागाच्या प्रभारी डॉ. मृणाल कुचलन यांनी या वेळी बीजोत्पादन करताना घ्यावयाची काळजी या संदर्भाने मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील २० कृषी उत्पादन संस्थांचे ९० शेतकरी सहभागी झाले होते.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन पासून दूध, पनीर, पकोडे, उपमा, हलवा असे उपपदार्थ तयार करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Soybean
Soybean Market : देशात अजूनही ७० लाख टन सोयाबीन शिल्लक?
सोयाबीनचा वापर वाढावा याकरिता त्याचा पौष्टिक खाद्यान्न म्हणून प्रसार होणे अपेक्षित आहे. त्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरीस्तरावर प्रयत्न झाले पाहिजे. नजीकच्या काळात हे केवळ तेलबियावर्गीय पीक न राहता खाद्यान्न म्हणून प्रसारित व्हावे.
डॉ. डॉ. के.एच. सिंह, संचालक, भारतीय सोयाबीन संस्था, इंदूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com