काहीच खटकत नाही का?

दहावी, बारावी परीक्षांचा काळ सुरू झाला रे झाला की आज-काल गावखेड्यांपासून ते शहरांपर्यंत सगळीकडे एकच गोष्ट दिसते. ती म्हणजे NEET, JEE, MS-CIT यांचे मोठ-मोठाले होर्डिंग्स.
काहीच खटकत नाही का?
Mashagat ArticleAgrowon

अजिंक्य कुलकर्णी

दहावी, बारावी परीक्षांचा काळ सुरू झाला रे झाला की आज-काल गावखेड्यांपासून ते शहरांपर्यंत सगळीकडे एकच गोष्ट दिसते. ती म्हणजे NEET, JEE, MS-CIT यांचे मोठ-मोठाले होर्डिंग्स. कुठेही जा हे होर्डिंग आहेतच! काहीच खटकत नाही का आपल्याला? या परीक्षा म्हणजेच शिक्षणातले सर्वस्व आहे का? पार गल्लीबोळात सुरू झालेल्या या खासगी क्लासेसमधून जो पैसा विद्यार्थ्यांकडून घेतला जातोय, त्याचा परतावा शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना मिळतो आहे का? याची खात्री करायला नको का? आज MS-CIT कोर्सचे सर्टिफिकेट असलेल्या मुलांना कम्प्युटरमध्ये वर्ड, एक्सेल पॉवरपॉइंट या गोष्टी तरी जमतात का? शिक्षणाची ही अशी इतकी वाताहत का झाली आहे?

आपल्याकडे इतका पैसा खर्च करूनही, मुलांच्या हातात पदवी-पदव्युत्तर याचे प्रमाणपत्र असतानाही मुलांना आत्मविश्वास का नसतो? का त्यांना नेहमी असं वाटत असतं की कंपनीत काही वशिला असल्याशिवाय आपल्याला नोकरी मिळणार नाही म्हणून? मग प्रश्‍न पडतो की पाच- पाच वर्षं ज्या पदवी- पदव्युत्तर शिक्षणासाठी ही मुलं झटत होती त्याचा काहीच उपयोग नाही का? जर वशिलाच लागत असेल तर मग तुम्ही काय ज्ञान कमावलंत?

हे असं शिक्षणाचं वाटोळं का झालं? अमर्त्य सेन यांचं छान उत्तर देतात. ते असं म्हणतात, की समस्त भारतीयांना प्रदीर्घ काळापासून ‘पहिला क्रमांक’ या लक्षण समूहाने (सिंड्रोम) पछाडलेले आहे. पन्नास वर्षांपूर्वी विंदा करंदिकरांनी याच भावनेतून ‘एटू लोकांचा देश’ ही कविता लिहिली होती. राष्ट्रीय पातळीवर अतिशय उच्च पदे उपभोगलेल्या व्यक्तींना देखील शाळेतील नंबराचा आणि गुणांचा विसर कधीही पडू दिला जात नाही. प्रगत देशात असे फाजील लाड होत नाहीत. भारताच्या संदर्भात सेन म्हणतात, वैयक्तिक पातळीवर न थांबता या ‘लाडांनी’ संपूर्ण शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली आहे.

आपल्या देशातील अकार्यक्षम व अतिशय सुमार प्राथमिक शिक्षण यंत्रणेमुळे कोट्यवधी मुले शिक्षणापासून दुरावतात. आर्थिक जागतिकीकरणाच्या काळात पूर्व आशियाई देशांचा चमत्कार जगासमोर आला, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीची ही परिणती होती. त्यामुळे या देशात नवीन रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध झाल्या. निर्यात वाढली. आरोग्याच्या समस्या कमी झाल्या. व्यक्ती, समाज व राष्ट्राचा विकास हा विद्येमुळे होत असतो. राष्ट्राचा विकास होण्यासाठी शिक्षणात मोठी गुंतवणूक करणे अपेक्षित असते. आपल्याकडे त्याचीच बोंब आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com