China Environment : आता चीनला सुचतोय पर्यावरणाचा विचार

चीन हे पूर्व आशियामधील १५० कोटी लोकसंख्येचे जगातील पहिल्या क्रमांकावरील राष्ट्र आहे. भौगोलिक क्षेत्र तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या या राष्ट्राच्या सीमा तब्बल १४ देशांबरोबर जोडलेल्या आहेत.
China Environment : आता चीनला सुचतोय पर्यावरणाचा विचार

कम्युनिष्ट विचारसरणी आणि बंदिस्तपणामुळे १९८० पर्यंत जगाशीही मोजकाच संपर्क असलेल्या चीन या राष्ट्राने १९८० ते २००० या काळात विकासामागे धावण्याच्या नादामध्ये पर्यावरणाचा (Environment) प्रचंड नाश केला. हवा प्रदूषणात (Air Pollution) जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेले चीन विकसनशील राष्ट्रांमध्ये सर्वाधिक कर्बवायू उत्सर्जन (Carbon Emission) करते. प्रत्येक व्यक्ती प्रतिवर्षी आठ टन कर्ब वायू निर्माण करते. अर्थात, अमेरिका प्रति व्यक्ती १६ टन कर्ब उत्सर्जनासह पहिल्या क्रमांकावर आहे.

China Environment : आता चीनला सुचतोय पर्यावरणाचा विचार
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

चीनने पर्यावरणाचा फारसा विचार न करता शहरांचा विकास, उद्योग आणि नागरिकांसाठी सुखसोईंनीयुक्त जीवनशैली यावर भर दिला. वाहतूक यंत्रणा आणि पाणी क्षेत्र अद्ययावत केले आहे. शहरामध्ये स्वच्छता, श्रीमंतीचा महापूर असताना ग्रामीण भाग आजही उपेक्षितच आहे. चीनमधील पर्यटन बहुतेक वेळा शहरी आणि ऐतिहासिक ठिकाणापर्यंतच मर्यादित राहते.

ग्रामीण भाग विशेषतः दडपला गेलेला अल्पभूधारक शेतकरी आणि कृषी क्षेत्रावरील होणारा वातावरण बदलाचा परिणाम जगासमोर फारसा येत नाही. जास्त लोकसंख्या, कमी शेत जमीन असलेल्या या देशामध्ये क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञान, बी-बियाणे आणि संशोधन यांच्या भरवशावर आपल्या जनतेच्या अन्नसुरक्षेसाठी काम करत आहे. जगाच्या तुलनेमध्ये केवळ ९ टक्के जमीन आणि जगाच्या २९ टक्के लोकसंख्येला अन्न पुरवणे, हे किती महाकाय काम आहे याचा अंदाज येईल. देशातील ७४ कोटी जनता संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे.

त्यातही अर्धा हेक्टर जमीन असलेले अल्पभूधारक त्यातील ९० टक्के असून, ४५ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. भूगर्भात मुबलक पाणी, वाहणाऱ्या लहान मोठ्या पाच हजार नद्या. त्यावर बांधलेल्या ८६ हजार धरणांपैकी ३० हजार धरणे १५ मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीची आहेत. या धरणामुळेच चीनने नद्यांच्या महापुरावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. चीनची लोकसंख्या, कृषिक्षेत्र आणि उद्योग धंदे उत्तर पूर्व भागात, तर नद्यांची संख्या दक्षिणेकडे जास्त आहे. दक्षिणेकडील नद्यांचे पाणी उत्तरपूर्व भागात वळविण्यात आल्या आहेत.

यांग यांगत्सी, पिवळी नदी, मेकांग, अमूर, हाँगई या प्रचंड लांबीच्या नद्यांनी या देशाच्या विकासात मोठी भर घातली आहे. तिबेटच्या पठारावर उगम पावणाऱ्या या नद्यांना पूर्वी महापूर येई. पुरामुळे वाहून येणारा प्रचंड गाळ, बदललेली पात्रे यामुळे लक्षावधी मृत्यू ठरलेले होते. या पुरांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेले आहे. या नद्यांच्या पात्रामध्ये जलवाहतूक, मासेमारी, जलविद्युत, पर्यटनासोबतच शेती, उद्योग आणि शहरी पाणीपुरवठा उपलब्ध केले. तिबेटच्या पठारावर सात हजार हिमनद्यांतील बर्फ वातावरण बदलामुळे वितळू लागले आहेत.

या नद्यांना महापूर येत असले, तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यात यश आलेले दिसते. चीनच्या वातावरणावर हिमालय, काराकोरम, कुलुन, लिआनशान या पर्वतरांगाचा आणि त्यामधील टाक्लमकान वाळवंट आणि गोबीच्या वाळवंटाचा चांगलाच प्रभाव आहे. दक्षिणेकडील समुद्र आणि पूर्वेचा प्रशांत महासागर सातत्याने उग्र स्वरूप दाखवत असतात, चीनचा पश्‍चिम, वायव्य आणि उत्तर भाग वैराण आहे.

China Environment : आता चीनला सुचतोय पर्यावरणाचा विचार
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

वातावरण बदलामुळे २०३० पर्यंत प्रत्येक ४ व्यक्ती मागे तीन जणांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार नसल्याचे अंदाज असून, भविष्यात हे जलसंकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. जागतिक तापमान वाढीचा प्रभाव जाणवू लागल्यामुळे या राष्ट्राने आतापासून जलसंपत्तीला प्राधान्य दिले आहे. तरीही यांगत्सी नदी खोऱ्यात कमी पावसामुळे आज प्रचंड मोठा दुष्काळ पडला आहे.

४० दशलक्ष लोकांना अन्न पाणी देणारी यांगत्सी नदी कोरडी पडत असून, त्याचा पूर्व चीनवर परिणाम झाला आहे. २.२ दशलक्ष हेक्टर शेत जमीन धोक्यात आली आहे. या नदीवरील विद्युत निर्मिती व उद्योग धंदे तात्पुरते बंद केले असून नदी परिसरातील एक कि.मी. भागातील रासायनिक उद्योगही हटवले आहेत. वाळू उपसा बंदी, मासेमारी बंदी लागू करून कृत्रिम

ढगनिर्मिती व पाऊस पाडण्याचे प्रयोग सुरू केले आहेत. या नदीजवळ असलेला पोयांग हा जगामधील सर्वांत सुंदर गोड्या पाण्याचा तलाव आज पूर्ण सुकलेला आहे. दक्षिण चीन ऑगस्ट महिन्यापासून ७० दिवस उष्णतेच्या लाटांनी भाजून निघाला आहे. येथील यांगत्सी नदी काठावरील लाखो लोक शांघाई शहरात गर्दी करत आहेत.

शहरांची सुंदरता हाच जगासाठी आरसा असून, शेतकऱ्यांच्या कष्टांकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ आहे? इथे प्रत्येकाला अनेक टॅक्स भरावे लागतात. शेतात धूर केला तरी शेतकऱ्यांना प्रदूषण कर भरावा लागतो, लग्न करावयाचे म्हटले तरी मॅरेज टॅक्स आहेच. शेतकऱ्यांचे अर्धे उत्पन्न कर भरण्यामध्येच जाते. येथे सबसिडी कमी आहे. पिकांना विमा कवच नाही. पुन्हा वातावरण बदलाची भीती वेगळीच.

China Environment : आता चीनला सुचतोय पर्यावरणाचा विचार
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

क्षारपड जमिनींची समस्या ः

चीनच्या बोहाई समुद्र किनाऱ्यालगत बारा हजार हेक्टर क्षेत्रावर यूवाँग (Yuwang) ही पाणथळ भूमी पसरली आहे. वातावरण बदलामुळे समुद्र खोलवर आत शिरत असल्यामुळे किनाऱ्यालगतचे हजारो हेक्टर क्षेत्र मिठाने नापीक झाले आहे. येथील शेतकरी वायीफँग (weifang) या समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरात स्थलांतरित झाले.

पर्यावरण बदलाची ही शोकांतिकाच होती. चिनी कृषी शास्त्रज्ञ प्रो. युवान लोंगपिंग यांना संकरित भाताचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी ही क्षार पडीक जमीन पुन्हा भात लागवडीखाली आणण्यासाठी कंबर कसली आहे. या शास्त्रज्ञाने या पांढरट जमिनीवर सागरी पाण्यावरील सुगंधी भाताचे उत्पादन यशस्वी करून दाखविले. २०१७ मध्ये सुरुवातीला येथे क्षारसहनशील गवताची लागवड केली. ती फुलोऱ्यात आल्यानंतर पुन्हा त्याच जमिनीत गाडली. ही पद्धत पुन्हा वापरताना शेणखताचा वापर वाढवून जमिनीमधील कर्ब आठपर्यंत नेला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com