Agriculture Research : आता शेतकऱ्याच्या संशोधनाला मिळणार पुरस्कार

शेतीमध्ये सतत नविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतीचा विकास होण्यासाठी भारत सरकार आणि कृषी संस्थांचा केवळ शेतीच नव्हे तर पशुपालन, यंत्रसामुग्री, तांत्रिक कामे करणाऱ्या लोकांचाही गौरव केला जाणार आहे.
Agriculture research
Agriculture researchAgrowon

कृषी क्षेत्रात नवनवे प्रयोग होत आहेत. पारंपरिक शेतीव्यतिरिक्त नवीन पिकांची लागवड केली जात आहे.

खर्च कमी करणारी, श्रम कमी करणारी, नफा जास्त मिळवून देणाऱ्या शेतीकडे कल वाढत आहे.

बरेच शेतकरी आपल्या गरजेनूसार शेतीत नवनविन संशोधन (New Research) करत असतात. अशा तंत्रज्ञानामुळे शेतीची बरीच कामं पूर्वीपेक्षा सोपी  झाली आहेत.

नवीन यंत्रे, नवीन कल्पना, नवीन तंत्र यामुळे शेतीची कामे आर्थिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे बरेच तरुण शेतीकडे वळत आहेत.

त्यामुळे शेतीमध्ये सतत नविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतीचा विकास होण्यासाठी भारत सरकार आणि कृषी संस्थांचा केवळ शेतीच नव्हे तर पशुपालन, यंत्रसामुग्री, तांत्रिक कामे करणाऱ्या लोकांचाही गौरव केला जाणार आहे.  

Agriculture research
Agriculture Research : कृषी विद्यापीठांचे संशोधन ‘लॅब टू लँड’ जाणे गरजेचे

तुम्हीही शेतीशी संबंधित काम करत असाल आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या या क्षेत्रात तुम्ही काही आगळेवेगळे काम केले असेल,

तुमच्या कल्पनांनी कृषी व्यवसायात नवनिर्मिती केली असेल, तर सज्ज व्हा कारण तुमचा सन्मान होणार आहे.

तुमची मेहनत आता जगाला दिसेल. तुमची मेहनत आणि तुमचे योगदान आता ओळखले जाईल.

कृषी क्षेत्रात काही तरी नवीन, काहीतरी वेगळे करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) आता पुरस्कार देणार आहे.

Agriculture research
Agriculture Drone : आता ५० टक्के अनुदानावर मिळणार ड्रोन

आपणही शेती सुलभ करण्यासाठी काही नवीन शोधले असेल तर तुम्हीही या सन्मानासाठी पात्र व्हाल, यासाठी तुम्हाला फक्त पुसा इन्स्टिटय़ूटच्या इनोव्हेटिव्ह फार्मर अॅवॉर्ड २०२३ आणि सहकारी शेतकरी पुरस्कारासाठी अर्ज करावा लागेल.

कृषी व्यवसायात झेंडे रोवणाऱ्या देशभरातील २५ शेतकऱ्यांचा शोध पुसा इन्स्टिट्यूट घेत आहे.

केवळ शेतीच नव्हे, तर पशुपालन, यंत्रसामग्री, तांत्रिक कामाशी संबंधित संशोधनालाही पुरस्कार दिले जाणार आहेत.

कसा करावा अर्ज ?

अर्ज करण्याची पहिली अट अशी आहे की अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

आपल्या कामाबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याला फक्त पासपोर्ट आकाराचा फोटो फॉर्मवर लावावा लागेल.

तुमच संशोधन नेमंक कशा संदर्भात आहे म्हणजे शेती, यंत्रसामुग्री, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन हे नमूद करावं लागेल.  

या संशोधनाचा नेमका काय फायदा झाला? तुम्हाला हा पुरस्कार मिळावा, यासाठी काय कारणं आहेत?, या संशोधनाचं भविष्य काय आहे?, भविष्यात खर्च आणि नफा किती असेल? या संदर्भात सर्व माहिती द्यावी लागेल.

हा फॉर्म पशुसंवर्धन, कृषी किंवा फलोत्पादन अधिकारी यांनी प्रमाणित करून भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सहसंचालकांकडे पाठवावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२३ आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रत स्कॅन करून भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सहसंचालक (प्रसार) यांच्या ई-मेल आयडीवर - jd_extn@iari.res.in पाठवू शकता.

निवड झालेल्या उमेदवाराला २ ते ३ मार्च २०२३ या कालावधीत होणाऱ्या पुसा कृषी विज्ञान परिषदेत गौरविले जाईल.  

त्यामुळे तुम्हीही शेतीत काम करणारे शेतकरी असाल, शेतीचा यशस्वी, वेगळा आणि आधुनिक दृष्टिकोन असेल तर उशीर न करता आत्ताच अर्ज करा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com