Crop Loan : नांदेडला पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण

नांदेड जिल्ह्यातील मागील हंगामात शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच ग्रामीण बँकांकडून दोन हजार १४५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
Crop Loan Scheme
Crop Loan SchemeAgrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील मागील हंगामात शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती बँक (District Central Bank) तसेच ग्रामीण बँकांकडून दोन हजार १४५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे (Distribution of crop loans) उद्दिष्ट देण्यात आले होते.

३१ मार्च २०२३ पर्यंत या बँकांनी ९९.२१ टक्क्यांनुसार दोन हजार १२८ कोटींचे पीक कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अनिल गचके यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात एक हजार ५८१ कोटी ५९ लाख तर रब्बी हंगामात ५६३ कोटी ८१ लाख असे एकूण दोन हजार १४५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले होते.

Crop Loan Scheme
Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाढवून मिळणार

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना वेळोवेळी केली होती. दरम्यान खरीप हंगामात ता. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४.३७ टक्क्यांनुसार एक लाख ९४ हजार ७९२ शेतकऱ्यांना एक हजार ४९२ कोटी ५० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

यानंतर ऑक्टोबरपासून रब्बीसाठी पीककर्ज वाटप करण्याचे काम सुरू झाले. यात रब्बी हंगामासाठी ५६३ कोटी ८१ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते.

जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत ७६ हजार ५३५ शेतकऱ्यांना ११२.८१ टक्क्यानुसार ३३६ कोटी तीन लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

यात ग्रामीण बँकेकडून १४१ टक्के, तर व्यापारी बँकांकडून ८३.२९ टक्के, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ११०.८९ टक्के कर्जवाटप केल्याची माहिती एलडीएम अनिल गचके यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com