Old Pension Scheme : चार हजार कर्मचारी कर्तव्यावर

नगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वर्ग-एकच्या ४४८ पैकी ४२५ अधिकारी हजर होते. वर्ग-दोनच्या ८५५ पैकी ६८१ अधिकारी हजर होते.
Old Pension Scheme State Employee Strike
Old Pension Scheme State Employee StrikeAgrowon

Nagar News : जुनी पेन्शन योजना लागू (Old Pension Scheme) करावी, यासाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप सलग दुसऱ्या दिवशी सुरू होता. जिल्ह्यात राज्य

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या २३ हजार ४२३ आहे. यांपैकी ६३५ अधिकारी-कर्मचारी रजेवर आहेत, तर ४ हजार ७९६ अधिकारी-कर्मचारी कामावर हजर आहेत.

महसूल, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा उपनिबंधक, वन विभाग, उपप्रादेशिक परिवहन, कृषी विभाग, पशुसंवर्धन उपायुक्त, भूजल सर्वेक्षण, क्रीडा, अन्न व औषधे प्रशासन, पोलिस अधीक्षक, आदिवासी विकास प्रकल्प, राजूर, पाटबंधारे अशा ४० विभागांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आठ विभागांच्या कर्मचाऱ्यांनी या संपाकडे पाठ फिरविली.

Old Pension Scheme State Employee Strike
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठीच्या संपात कर्मचाऱ्यांचा सहभाग

जिल्हा उद्योग केंद्र, नगररचना, एमआयडीसी, रेशीम उद्योग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, मार्केटिंग अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अशा आठ विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी या संपापासून अलिप्त आहेत.

नगर, जिल्ह्यात वर्ग-एकचे ४४८, वर्ग-दोनचे ८५५, वर्ग-तीनचे २० हजार ४२४, तर वर्ग-चारचे १ हजार ६९६ कर्मचारी कार्यरत आहेत. काही अधिकारी आणि कर्मचारी पूर्वनियोजित रजेवर गेले आहेत.

वर्ग-एकचे २३, वर्ग-दोनचे २१, वर्ग-तीनचे ५३२, तसेच वर्ग-चारच्या ५९ कर्मचाऱ्यांनी रजा टाकली आहे. अधिकारी-कर्मचारी दोन्ही मिळून ६३५ जण अधिकृतपणे रजेवर आहेत.

या संपामध्ये वर्ग-एकचे अधिकारी सहभागी झालेले नाहीत. वर्ग-दोनचे १५३ अधिकारी सहभागी झाले आहेत. वर्ग-तीनचे १६ हजार ८२० कर्मचारी सहभागी झाले आहेत. वर्ग-चारचे १ हजार १९ कर्मचारी सहभागी झाले आहेत.

नगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वर्ग-एकच्या ४४८ पैकी ४२५ अधिकारी हजर होते. वर्ग-दोनच्या ८५५ पैकी ६८१ अधिकारी हजर होते. वर्ग-तीनचे ३ हजार ७२ कर्मचारी हजर होते. वर्ग-चारचे ६१८ कर्मचारी हजर होते.

जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गातील वाहनचालक, शिपाई आणि काही लिपिक कर्तव्यावर हजर होते. त्यांनी सही मात्र केली नसल्याचे दिसून आले.

Old Pension Scheme State Employee Strike
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबद्दल हेरंब कुलकर्णी यांची वेगळी भूमिका

जिल्हा परिषद सुनीसुनी

जुन्या पेन्शनसाठीच्या संपात जिल्हा परिषदेतील १३ हजार ८८४ कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा केला आहे. १ हजार ४७९ कर्मचारी कामावर आहेत. आरोग्यसेविकाही संपात सहभागी झाल्याने यंत्रणेवर ताण आला. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत खंड पडू दिला नाही.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. संपकऱ्यांची संख्या मोठी असली, तरी जिल्हा परिषदेतील तब्बल दीड हजार कर्मचारी कामावर होते. जिल्हा परिषदेचे एकूण १५ हजार ६३३ कर्मचारी आहेत.

त्यांपैकी चारही संवर्गातील ३२० कर्मचारी पूर्वपरवानगीने अगोदरच रजेवर गेले आहेत. मुख्यालयात केवळ ३० ते ३५ कर्मचारी हजर असल्याने जिल्हा परिषदेत सुनी सुनी होती. जे कर्मचारी आदेश धुडकावून संपात सहभागी झाले आहेत, त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईच्या नोटिसा काढल्या आहेत.

दहावी-बारावीची परीक्षा सुरळीत आहे. आरोग्य सेवेतही खंड नाही असे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com