
Jalgaon News : कांदा पिकाच्या उत्पादकतेत (Onion Productivity) वाढ मिळविण्यासह गुणवत्ता, दर्जा सुधारण्यासाठी वाणांची निवड (Onion Verity), तंत्रज्ञानाचा किफायतशीर वापर आणि उच्च तंत्रज्ञान (Agriculture Technology) लाभदायी ठरत असल्याचे मत शास्त्रज्ञांनी जैन हिल्स (जळगाव) येथे कांदा प्रक्षेत्र, प्रक्रिया (Onion Processing) केंद्रास भेट दिल्यानंतर व्यक्त केले.
जळगाव शहरानजीकच्या जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय कांदा (Onion) व लसूण चर्चासत्राचा सोमवारी (ता.१३) तिसरा दिवस होता.
यानिमित्त अधिकारी, शास्त्रज्ञ, अभ्यासकांसाठी जैन हिल्स येथील कांदा लागवड प्रक्षेत्र, त्यासाठी वापरलेले सिंचन तंत्रज्ञान, टाकरखेडा (ता.एरंडोल) येथील प्रयोगशाळा व इतर केंद्र आदींना भेट, पाहणी कार्यक्रम घेण्यात आला.
कोकण कृषी विद्यापीठ तथा आयएसएचे अध्यक्ष डॉ.के.ई.लवांडे, राजगुरूनगर (जि. पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ राजीव काळे, चर्चासत्र संयोजन सचिव डॉ. विजय महाजन, शास्त्रज्ञ डॉ. ए. थंगासामी, जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ के. बी. पाटील, अनिल ढाके, डॉ. मेजर सिंह आदी या कार्यक्रमात सहभागी झाले.
शास्त्रज्ञांनी जैन हिल्स येथील कांद्याच्या ८२ जातींची लागवड केलेल्या प्रक्षेत्रात भेट दिली. तसेच या क्षेत्रात रेन पाइप, तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर करून वाढविलेल्या कांदा पिकासंबंधी माहिती घेतली.
या परिसरातील भविष्यातील शेती (पाण्यातली शेती, हवेतली शेती) आदी संकल्पनांची माहितीदेखील फ्युचर फार्मिंग केंद्राला भेट देवून घेण्यात आली.
टाकरखेडा (ता.एरंडोल) येथील जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या केळी व इतर फळ पिकांची प्रयोगशाळा व इतर बाबींची माहिती घेण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.