Onion Rate : ‘आमच्या जीवनात ना ‘अर्थ’ ना ‘संकल्प’

राज्यभरात कांदा उत्पादक दर मिळत नसल्याने हवालदिल आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले.
Onion Rate
Onion Rate Agrowon

Nashik onion Rate : ‘‘पोटच्या पोरासारखे कांद्याला जपायचे. एकीकडे वेळेवर वीजपुरवठा नाही, रात्री लाइट आल्यावर कधीही रात्री झोपेतून उठावे लागते. असे असताना बिबट्या, विंचू, सर्प यांची कुठली भीती न बाळगता रात्री कडाक्याच्या थंडीत पाणी भरले.

मात्र आता कष्टाने पिकविलेल्या कांद्याला (Onion Crop) मोल मिळेल अशी आशा विरली. त्यामुळे आमची सगळी आर्थिक घडी विस्कटली. आता राज्याचा अर्थसंकल्प सुरू आहे.

मात्र कांदा उत्पादकांच्या जीवनात ना ‘अर्थ’ राहिला, ना कुठला ‘संकल्प’ अशी व्यथा मोरेनगर (ता. सटाणा) येथील कांदा उत्पादक किरण मोरे यांनी व्यंग्यचित्रातून मांडली आहे.

यातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

Onion Rate
Onion Procurement : ‘नाफेड’ बाजार समितीत कांदा खरेदी करणार

राज्यभरात कांदा उत्पादक दर मिळत नसल्याने हवालदिल आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा कशीबशी रोपे तयार करून दुबार लागवडी केल्या. त्यात विजेची टांगती तलवार असल्याने रात्री उठून कांद्याला पाणी भरले.

अशी परिस्थिती असतानाही कांदा उत्पादनात घट आली आहे. असे असताना निघेल तो कांदा काढणी करून शेतकरी बाजारात आणत आहेत. मात्र मिळणाऱ्या दराने उत्पन्नाचे कुठलेही गणित जुळत नाही.

तर उत्पादन खर्चाच्या खाली कांदा विकावा लागत आहे. सरकारने आमच्या प्रश्नांकडे एकदा पहावे, असा टाहो शेतकरी फोडत आहेत.

‘कधी नव्हे एवढे दर पडले’

मातीतून आलेला हा रांगडा लाल आज मातीमोल झाला, उन्हाळ कांद्याला पण खूप चटके सोसावे लागले, वर्षे सरली पण बाजार भाव नाही वाढले, आजही खूप संघर्ष सुरू आहे, कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.

आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे, मोर्चा, निवेदने देऊन ही सरकारला काडीचाही घाम फुटत नाही. अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. परंतु बळीराजा आज अर्थहीन आहे, अशी वेदना किरण मोरे यांनी मांडली आहे.

Onion Rate
Onion Rate : उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा
मागील रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पन्न भांडवल म्हणून वापरले. त्यात आता लेट खरीप कांद्याला भाव नाही. पुढे कसे उभे राहायचे, हा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी मुलांचे शिक्षण, लग्न, आरोग्य, घराचे बांधकाम व शेतीविकास अशी कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे कसे उभे राहायचे हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे होणाऱ्या वेदना शब्दांत सांगता येत नाही.
किरण मोरे, कांदा उत्पादक, व्यंग्यचित्रकार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com