Department of Agriculture : ... तरच ऑनलाइन मार्केटिंग हितकारक

कीडनाशकांच्या ऑनलाइन विक्रीत मात्र कीड-रोगनिहाय कोणते कीडनाशक, किती प्रमाणात वापरायचे याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन झाले पाहिजेत. कृषी विभागाच्या विस्तार यंत्रणेने हे काम करायला हवे.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

रासायनिक खतानंतर (Chemical fertilizers) आता कीडनाशकांची ऑनलाइन विक्री करता येणार आहे. केंद्रीय कृषी (Central Agriculture) आणि शेतकरी (Farmer) कल्याण मंत्रालयाने कीडनाशकांच्या ऑनलाइन विक्रीत नियम-अटींच्या पालनासह नुकतीच परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया धोरणाला पूरक हा निर्णय मानला जातोय. खरे तर आता ऑनलाइन मार्केटिंगचेच युग आहे.

Department Of Agriculture
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

कोरोना लॉकडाउन आणि त्यानंतरच्या काळात खाद्यपदार्थ, घरगुती नित्योपयोगी सेवा-वस्तू तसेच इलेक्ट्रिक-इलेक्ट्रॉनिक अशा बहुतांश उत्पादनांच्या ऑनलाइन मार्केटिंगला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. शेतीमध्ये सुद्धा शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी तसेच यातील व्यावसायिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करीत आहेत. अशावेळी कीडनाशके ही शेतीतील एक मुख्य निविष्ठा शेतकऱ्यांना ऑनलाइन खरेदी करता आली तर त्याचे स्वागतच करायला पाहिजेत.

या निर्णयापू्र्वी देशातील काही ई-कॉमर्स आणि कीडनाशके उत्पादन करणाऱ्या कंपन्या कीडनाशकांची ऑनलाइन विक्री करीत होत्या. परंतु नियम-अटी स्पष्ट नसल्याने त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण होते. हा संभ्रम आता दूर होऊन ऑनलाइन विक्रीला चालना मिळेल. आज आपण पाहतोय कीडनाशकांची विक्री कृषी सेवा केंद्रातून होतेय. एवढेच नाही तर कीडनाशके खरेदी करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र चालकांचेच मार्गदर्शन होते.

मध्यस्थांच्या साखळीतून अशाप्रकारे विक्री होणाऱ्या कीडनाशकांचे दरही अधिक पडतात. शिवाय कीडनाशकांबरोबर इतरही अनेक घटक टॉनिक, जैविक-सेंद्रियच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. यात कृषी सेवा केंद्र चालकांचा चांगला व्यवसाय होत असला, तरी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मात्र वाढ होते.

Department Of Agriculture
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

कीडनाशकांच्या ऑनलाइन विक्रीत मात्र कीड-रोगनिहाय कोणते कीडनाशक, किती प्रमाणात वापरायचे याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन झाले पाहिजेत. कृषी विभागाच्या विस्तार यंत्रणेने हे काम करायला हवे. तसे झाले नाही तर याबाबतच्या मार्गदर्शनाची मोठी पोकळी निर्माण होऊन बहुतांश अल्प-अत्यल्प भूधारक शेतकरी कीडनाशकांच्या ऑनलाइन खरेदीला मुकतील. आता बहुतांश कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना उधारीवर तसेच हप्त्याने पैसे देण्याच्या सवलतीवर कीडनाशके देतात.

कीडनाशकांची ऑनलाइन खरेदी मात्र शेतकऱ्यांना आधी पूर्ण पैसे भरून करावी लागेल अथवा माल घरी पोहोचल्यावर तरी पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीतील बहुतांश शेतकरी अशी खरेदी करू शकणार नाहीत. यावर कंपन्यांना काही तोडगा काढता येतो का, याचाही विचार करावा. ऑनलाइन खरेदीत शेतकऱ्यांकडून आवश्यक त्याच कीडनाशकांची खरेदी होऊन त्यांचा अतिरिक्त खर्च वाचू शकतो.

देशात-राज्यात बनावट, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांच्या विक्रीचा सुळसुळाट आहे. ऑनलाइन विक्रीत अशा सर्व प्रकारांना आळा बसेल, ही काळजी देखील कंपन्यांना तसेच कृषी विभागाला घ्यावी लागणार आहे. ऑनलाइन विक्रीत मध्यस्थ राहणार नाहीत, असे बोलले जात असले तरी बहुतांश कंपन्या मध्यस्थांच्या मार्फतच ऑनलाइन विक्री करतील,

अशावेळी कीडनाशकांचे दर वाढणार नाहीत, हेही कंपन्यांना पाहावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे कीडनाशकांची ऑनलाइन विक्री झाली तरी त्याचा पुरवठा स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना करावा लागेल. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांनाही यामध्ये व्यवसायाच्या संधी आहेत.

Department Of Agriculture
Onion Seed Production : कांदा बीजोत्पादनामध्ये लागवड तंत्र महत्त्वाचे

महत्त्वाचे म्हणजे नित्योपयोगी उत्पादनांच्या ऑनलाइन खरेदीत अनेक वेळा ग्राहकांची फसवणूक होतेय. ऑनलाइन पैसे भरून वस्तू-सेवा मिळत नाही, काही वेळा अत्यंत दुय्यम दर्जाचा माल मिळतो. अशा फसवणुकीनंतर सायबर क्राइमने हात वर केल्यावर त्यांना कुणाकडेही दाद मागता येत नाही. कीडनाशकांच्या खरेदीत अशी फसवणूक होणार नाही, ही खबरदारी घ्यावी लागेल. फसवणूक झाली तर दाद मागण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल. असे झाले तरच ऑनलाइन प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी हितकारक ठरेल, अन्यथा नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com