कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इस्राईलमध्ये संधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि इस्राईलचा करार
कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इस्राईलमध्ये संधी
Agriculture StudyAgrowon

नगर ः इस्राईल देशातील कृषी क्षेत्रातील (Israel Farming ) प्रगत तंत्रज्ञानातून तेथील शेतीचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (MPKV) विद्यार्थ्यांना इस्राईलमध्ये जाऊन अभ्यास (Agriculture Study) करता येणार आहे. इस्राईलमधील विद्यार्थीही राहुरी विद्यापीठात येऊन अभ्यास करू शकतात. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील व इस्राईलच्या पर्यटन मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला.

बीएस्सी ॲग्रीच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना काही दिवस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अभ्यास करावा लागतो. इस्राईल देशात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे तसेच एकूण क्षेत्रफळाच्या २० टक्के क्षेत्रावर शेती केली जाते. असे असूनही पर्यटन विकासाच्या दृष्टीने काम केले जाते. त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही इस्राईलमध्ये जाऊन तेथील शेती, पर्यटन विकासासाठी अभ्यास करण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक चांगले पाऊस उचलले असून, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील व इस्राईलच्या पर्यटन मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, इस्राईल पर्यटन मंत्रालयाचे संचालक श्री. सॅमी याहिया, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, ‘इस्कॉन’चे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुष्करणा, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, कुलगुरूंचे विशेष कार्यअधिकारी डॉ. महानंद माने, अन्नशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण व कुलगुरूंचे तंत्र अधिकारी डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून इस्राईल या देशातील कृषी क्षेत्रात केलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. भारतामध्ये अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे इस्राईल सारख्या देशांना निर्यातीसाठी चालना मिळू शकेल. सॅमी याहिया यांनी इस्राईल देशात होत असलेल्या अतिप्रगत इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील स्वयंचलन सेन्सर्स व नियंत्रण पद्धती, जैविक कीडनाशके याबद्दल तर डॉ. पुष्करणा यांनी शिक्षणामध्ये अनुभवात्मक शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी इस्राईलमधील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली. या करारांतर्गत विद्यापीठातील विविध शाखांतील २० ते ५० विद्यार्थी ७ ते १० दिवसांच्या कालावधीसाठी अनुभवावर आधारित शिक्षण घेण्यासाठी इस्राईल देशात जाऊ शकणार आहेत, असे डॉ. रवी आंधळे यांनी सांगितले.

पर्यटन शेती फायदेशीर

पारंपरिक शेतीसोबत पर्यटन शेतीला चालना मिळाली यासाठी राज्यात कृषी विभाग, शासन प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पर्यटन शेतीला प्राधान्य दिले असून फायदेशीर असल्याचे सांगितले जातेय. नव्याने कृषी क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा पर्यटन शेतीकडे कल वाढेल यासाठी हा करार फायदेशीर ठरेल, असे सांगितले जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com