
Badlapur News : बदलापूर शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यातून ओला कचरा वेगळा करून त्यातून सेंद्रिय खत (Organic Fertilizer) बनवण्याचा प्रकल्प कुळगाव बदलापूर नगरपरिषद मांजर्ली येथील स्मशानभूमीत गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहे.
मात्र, हा प्रकल्प हटवण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकल्पामुळे परिसरात घाण झाली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
बदलापूर पश्चिम मांजर्ली येथील वैकुंठधाम या पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीत सात वर्षांपासून पालिकेने सेंद्रिय खत प्रकल्प राबवला आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र या प्रकल्पाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
येथील यंत्रसामग्री मोडकळीस आली आहे. तसेच, हा प्रकल्प उघड्यावरच असल्याने इथे डास, माशा, कीटक यांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे.
त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाले असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकल्प स्मशानभूमीत आहे. या प्रकल्पाशेजारीच शौचालये आहेत.
स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना येथे उभे राहणेही अवघड होते. त्यामुळे हा प्रकल्प येथून हलवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.