Climate Change Effect In Fruit Orchard : बदलत्या वातावरणाचा फळबागांना बसतोय फटका

कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण, उन्हाचा चटका अशा बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका फळबाग उत्पादकांना होत आहे.
Climate Change Effect
Climate Change EffectAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण, उन्हाचा चटका अशा बदलत्या वातावरणाचा (Climate Change) सर्वाधिक फटका फळबाग उत्पादकांना होत आहे.

रमजान महिना डोळ्यासमोर ठेवून अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांचे नियोजन केले होते. मात्र, बदलत्या वातावरणात द्राक्ष काळे पडून सुकल्याने शेतकऱ्यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे.

पळशी (शहर) ता.छत्रपती संभाजीनगर येथील सुखदेव पळसकर यांची अडीच एकरवर द्राक्ष बाग आहे. त्यांनी रमजान महिन्यात चांगला दर मिळेल या आशेने फळांचे नियोजन केले होते.

मात्र, कधी ढगाळ वातावरणामुळे फळबागेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांनी द्राक्षबागेवर खत-औषधांसाठी अडीच लाख रुपयांचा खर्च केला होता.

Climate Change Effect
Climate Change : ढगाळ, पावसाळी वातावरणाचे द्राक्ष बागेवर होणारे परिणाम

मात्र, फळधारणा झाल्यानंतर द्राक्षे काळे पडून सुकत चालले आहे. त्यांनी औषधींचा वापर करून ही बघितला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. द्राक्ष बाग व्यापारी येऊन बघतात मात्र, ती घेण्यास नकार देत असल्याचे

चित्र आहे. द्राक्षे काळे पडल्याने ते बाजारात वीस ते तीस रुपये किलोसुद्धा कुणी घेण्यास तयार नाही. यासोबत बदलत्या वातावरणामुळे डाळिंब बागांचे सुद्धा नुकसान होत आहे.

शेतात तीन वर्षांपासून द्राक्ष बाग आहे. याचे नियोजन कसे करायचे हे सर्व माहिती आहे. मात्र, यावर्षी व्यवस्थित नियोजन करून सुद्धा द्राक्ष काळे पडले आहे. कित्येक द्राक्ष तर झाडालाच सुकून गेल्याने यावर्षी खत-औषधींचा खर्च निघणे अवघड झाले आहे.
सुखदेव पळसकर, द्राक्ष बाग शेतकरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com