तुम्हाला बायोकॅप्सूल माहिती आहेत?

जैविक खते आता कॅप्सूल स्वरुपात उपलब्ध झाली आहेत.
Biocapsule
BiocapsuleAgrowon

कॅप्सूल म्हणल की आपल्याला आपण आजारी पडल्यानंतर ज्या घेतो त्या औषधांच्या विविध रंगाच्या कॅप्सूल स्वरुपातील गोळ्या डोळ्यासमोर येतात. पण आता पिकांसाठीही आशाच कॅप्सूल उपलब्ध झाल्या आहेत. हवं तर आपण याला पिकांचे टॉनिक ही म्हणू शकतो. ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून उत्पादनात वाढ होते.

जमिनीची सुपिकता Soil Fertility ही त्यामध्ये असलेल्या सेंद्रिय घटकावर आणि उपयुक्त सुक्ष्मजीवावर ठरत असते. मातीतून दिलेली किंवा उपलब्ध असलेली खते पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम सूक्ष्मजीव करतात. त्यामुळे बीजप्रक्रिया Seed Treatment व आळवणीद्वारे सूक्ष्मजीवांचा समावेश असलेल्या (जैविक) खतांचा वापर केला जातो. जैविक खतामुळे (Organic Fertilizer) हवेतील नत्र शोषला जाऊन तो पिकांना उपलब्ध करून दिला जातो. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून दर्जेदार उत्पादन मिळते. तर अशी ही जैविक खते उत्पादन वाढीसाठी अतिशय महत्वाची आहेत. ही जैविक खते आता कॅप्सूल (Capsule) स्वरुपात उपलब्ध झाली आहेत.

Biocapsule
जमिनीची सुपिकता व काटेकोर शेतीचा ध्यास

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोझीकोडे (केरळ) येथील भारतीय मसाले संशोधन संस्थेने नॅनो तंत्रज्ञानावर आधारित "मायक्रोबियल इन्कॅप्सुलेशन" तंत्रज्ञानातून बायोकॅप्सूल खते विकसित केली आहेत. या मायक्रोबियल कॅप्सूलेशन तंत्राला पेटंटही मिळाले आहे. जैव खत उद्योग जगतातील हे पहिले इन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञान असल्याचा दावा येथील संशोधकांनी केला आहे.

Biocapsule
रासायनिक खते टाळून  सेंद्रिय, जैविक खते वापरा 

बायोकॅप्सूलचा प्रसार होण्यासाठी रशियासोबत करार
या बायोकॅप्सूलचा जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी आणि या कॅप्सूलची उपयुक्तता शेतकऱ्यांच्या लक्षात येण्यासाठी भारतीय मसाले पिक संशोधन संस्थेने (आयआयएसआर) बायोकॅप्सूलच्या व्यापारीकरणासाठी रशियास्थित लिस्टर्रा एलएलसी या कंपनीशी सामंजस्य करारही केला आहे. याशिवाय चार भारतीय कंपन्यांनी या इन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून बायोकॅप्सूलच्या व्यावसायिक उत्पादनासाठी आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी भारतीय मसाले संशोधन संस्थेकडून यापूर्वीच परवाने मिळवले आहेत.

Biocapsule
‘बायो कॅप्सूल’द्वारे हरभरा मर रोग व्यवस्थापन प्रात्यक्षिक

बायोकॅप्सूलचा काय आहे फायदा?
बायोकॅप्सूल पिकांना अतिशय उपयुक्त असून कमी खर्चात उपलब्ध होतात. याची हाताळणी आणि साठवणूक सहजपणे करता येते. याशिवाय या बायोकॅप्सूल पर्यावरणपूरक असून यांची टिकवणक्षमताही चांगली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com