Dhan Khradi : पनवेल खरेदी केंद्रावरचा भात भिजला

दरवर्षी खरीप हंगामातील भाताची खरेदी ३१ मार्चपर्यंत चालते. मात्र या वर्षी त्याआधीच भात खरेदी करण्याची मुदत सरकारकडून देण्यात आली होती.
Dhan Khradi
Dhan KhradiAgrowon

Panvel News ः पनवेल सहकारी भात खरेदी केंद्रावर (Panvel Cooperative Rice Buying Center) दोन महिन्यांपासून पडून राहिलेले भात वेळेत न उचलल्यामुळे अखेर मंगळवारी (ता. ७) अवकाळी पावसात भिजला.

मंगळवार सकाळपासून झालेल्या पावसाच्या शिडकावाचा फटका केंद्राबाहेर उघड्यावर ठेवलेल्या भाताच्या गोण्यांना बसला आहे. ‘सकाळ’ने भात भिजण्याची शक्यता या आधी प्रसिद्ध केलेल्‍या वृत्तात वर्तवली होती.

दरवर्षी खरीप हंगामातील भाताची खरेदी ३१ मार्चपर्यंत चालते. मात्र या वर्षी त्याआधीच भात खरेदी करण्याची मुदत सरकारकडून देण्यात आली होती. यादरम्यान भात भरडण्याचा ठेका देणाऱ्या कंत्राटदारांची मुदत संपून गेल्याचा विसर रायगड जिल्हा प्रशासनाला पडला होता.

Dhan Khradi
Ajit Pawar : धान खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा

पनवेल सहकारी भात खरेदी केंद्रावर प्रमाणापेक्षा अधिक भात खरेदी केल्यामुळे बहुतांश भाताच्या गोण्या गोदामाबाहेर ठेवण्याची वेळ आली.

अशा परिस्थितीत लवकरात लवकर भाताच्या गोण्याच्या उचलण्याची व्यवस्था करावी अशी विनंती भात खरेदी केंद्र चालकाकडून करण्यात येत होती.

दरम्यान भात उचलण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती न झाल्यामुळे पनवेलच्या सहकारी भात खरेदी केंद्रावर तब्बल पाच हजार क्विंटल भात पडून राहिले. जानेवारीच्या १५ तारखेपासून मार्च महिला उजाडला तरी भाताच्या गोण्या उन्हात उघड्यावर पडल्या आहेत.

Dhan Khradi
Paddy Subsidy : धान प्रोत्साहन अनुदानासाठी एक हजार कोटींची मान्यता

याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली होती. १६ फेब्रुवारीला तेव्हा लवकरच ठेकेदारांची नियुक्ती करून पडलेला भात उचलण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी दिले होते.

मात्र त्यानंतरही योग्‍य दखल न घेतल्‍याने अवकाळी पावसात उघड्यावर पडलेला भात भिजले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com