
Panvel News : राज्य सरकारने दिलेल्या मुदतीच्या आधी भातखरेदी (Rice Kharedi) करूनसुद्धा पनवेल सहकारी भातखरेदी केंद्रावर गेल्या महिनाभरापासून पाच हजार क्विंटल भात धूळ खात पडला आहे.
हा भात (Rice) उचलण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून गिरणी ठेकेदारांची नियुक्ती झाली नसल्याने खरेदी केलेला भात उघड्यावरच पडून सडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामांमध्ये शेती होते. त्यापैकी खरिपात केलेल्या शेतीमधील भाताची खरेदी ३१ जानेवारीपर्यंतच करावी, अशी सरकारने अट घातली होती.
मात्र या कालावधीत अपेक्षित खरेदी झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देत १५ फेब्रुवारीपर्यंत खरेदी करण्यात आली. सध्या पनवेलच्या सहकारी भात खरेदी केंद्रावर तब्बल पाच हजार क्विंटल भात पडून आहे.
जानेवारी महिन्याच्या १५ तारखेपासून आत्तापर्यंत भाताच्या गोण्या उन्हात उघड्यावर पडल्या आहेत. हे धान्य उचलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अद्याप गिरणी ठेकेदारांची नियुक्ती केली नसल्याचे समजते आहे. धान्य उघड्यावर पडून राहिले आहे.
पनवेल सहकारी भात खरेदी केंद्राच्या मालकीचे गोदामात अर्धा माल आणि निम्मा भाताच्या गोण्या गोदामाबाहेर पडल्याने, तसेच वातावरणात धुके पसरत असल्यामुळे भात सडण्याची भीती व्यक्त होत आहे.
खरेदीसाठी दोनदा मुदतवाढ
पनवेल तालुक्यातील १,१५० शेतकऱ्यांनी भात विकला आहे. तर उरणमधील ४६५ शेतकऱ्यांनी भात विकला आहे. सुरुवातीला ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती.
ती वाढवून १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांकडे असणारा शिल्लक धान्यसाठा पाहता आता ही मुदतही २८ फेब्रुवारीपर्यंत करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.