पाहूणचार

पाहूण्याचा पाहूणचार चार दिवस. नेमकी हिच मेख टाकळी ढोकेश्वर शिवारातला एक मास्तर विसरला. एकदा झालं. दोनदा झालं. जावई दर शनिवार रविवार, गणपती, दसरा, दिवाळी, उन्हाळा, आख्खी सुट्टीच्या सुट्टी आळेफाट्यावर सासुरवाडीलाच मुक्काम ठोकायला लागला.
पाहुणचार
पाहुणचारAgrowon

जुन्नर आणि पारनेर या अगल बगच्या दोन तालुक्यात शिक्षकांची संख्या प्रचंड. आपसुकच दोन्हीत सोयरीकीही भरपूर. पण दोन्हींच्या संस्कृतीत, चाली रितीत मोठा फरक. मग कधी मेळ बसतो तर कधी त्रांगडं.

पाहुणचार
Indian Media : वृत्तपत्रांचे बदलते जग

जुन्नरचा बहुतेक भाग बागायती. त्यात मजुरांची कमतरता. यामुळं घरातल्या लहानथोरांपासून सगळी सदानकदा कामावर पासली पडलेली. याउलट पारनेर. बहुतेक भाग जिरायती. पावसाळा सोडला तर शेतीची फारशी कामंही नाहीत. अशा वेळी बहुतेक मास्तरांचे पाय सासुरवाडीला धाव घेतात.

पाहुणचार
Agriculture Labors : मजूर खरंच मजेत आहेत का ?

पाहूण्याचा पाहूणचार चार दिवस. नेमकी हिच मेख टाकळी ढोकेश्वर शिवारातला एक मास्तर विसरला. एकदा झालं. दोनदा झालं. जावई दर शनिवार रविवार, गणपती, दसरा, दिवाळी, उन्हाळा, आख्खी सुट्टीच्या सुट्टी आळेफाट्यावर सासुरवाडीलाच मुक्काम ठोकायला लागला. बरं जावई म्हटलं की जंगी बंदोबस्त आलाच. काम सोडून त्याच्या मागं धावायला इथं टाईम कुणाकडं. भावकीत चर्चा व्हायला लागली. सासरा जुन्या वळणाचा. त्याच्या डोक्यात काय हे खुळ बसंना...

एकदा त्याचा खटका पडलाच. त्यानं जावयाला हळूच बारीक सारिक कामं सांगायला सुरवात केली. एवढी दोरी वळून द्या. म्हशींना पाणी दाखवता का. सासुला घासाचं वझं उचलून द्या. घासातल्या मिरच्या तोडून आना. मग पुढं मकंचं एखादं वझं कापून आना...

गादी, लोडाऐवजी कामांची यादी आणि लोड वाढत चालल्यावर जावयाचं धाबं दणाणलं. आणि महाराजांनी पाय आखडतं घेतलं. अनावश्यक फेऱ्या कमी झाल्या. सासरा जावई दोघांचाही मान वाढला. आणि ते आपापल्या घरी सुखाने नांदू लागले.

इति जावई आख्यान समाप्तम् !

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com