मानाच्या बैलजोडीचा मान आळंदीतील वरखडे घराण्याला

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा मान यंदा आळंदीतील वरखडे घराण्याला मिळाला आहे.
मानाच्या बैलजोडीचा मान आळंदीतील वरखडे घराण्याला
Palkhi SohalaAgrowon

आळंदी ः संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात (Sant Dyaneshwar Maharaj Palkhi Sohala) चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा (Ox Pair) मान यंदा आळंदीतील वरखडे घराण्याला असून, गुरुवारी (ता. २) पुण्यातील फुरसुंगी येथील शेतकऱ्याकडून खिलार बैलजोडी (Khilar Bull) विकत घेतल्याची माहिती पांडुरंग वरखडे यांनी दिली.

बैलजोडी समितीची बैठक सव्वा महिन्यापूर्वी आळंदीत झाली. त्या वेळी बबनराव कुऱ्‍हाडे, नंदकुमार कुऱ्‍हाडे, विलास घुंडरे, शिवाजी रानवडे, रामचंद्र भोसले यांच्यासह सर्व सदस्यांची हजेरी होती. बैठकीदरम्यान पांडुरंग वरखडे यांना बैलजोडी जुंपण्याचा मान मिळाला. दरम्यान, फुरसुंगी येथे गुरुवारी रात्री फुरसुंगीकरांनी फटाक्यांची आतषबाजी आणि मिरवणूक काढून बैलजोडी वरखडे यांच्या ताब्यात दिली. आळंदीत मानाची बैलजोडी रात्री उशिरा दाखल झाली. बैलजोडीचा मान मिळाल्याने वरखडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे माउलींचा पालखी सोहळा पायी गेला नाही. त्यामुळे रथाऐवजी एसटीने माउलींच्या पादुका पंढरीस नेण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने पायी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com