World Cancer Day
World Cancer DayAgrowon

Health : स्वादुपिंडाचा कर्करोग

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार जागतिक स्वादुपिंड कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी आज १७ नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जात आहे.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार जागतिक स्वादुपिंड (Pancreas) कर्करोग (Cancer) दिवस (World Cancer Day) म्हणून साजरा केला जातो. या वर्षी आज १७ नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जात आहे. या दिवसाच्या निमित्ताने जगभरातील स्वादुपिंड आणि कर्करोगावर काम करणारे समुदाय व संस्था स्वादुपिंडाच्या कर्करोगावर जनजागृतीसाठी एकत्र येतात.

World Cancer Day
Sugar Market : काही कारखान्यांनी मोडले साखर विक्रीचे करार

स्वादुपिंडाबाबत थोडेसे...

स्वादुपिंड ही एक ग्रंथी आहे, जी शरीरातील इन्सुलिन आणि इतर हार्मोन्स बनवते. हे हार्मोन्स रक्तप्रवाहात प्रवेश करून आणि संपूर्ण शरीरात प्रवास करतात. ते शरीराला अन्नातून मिळणारी ऊर्जा वापरण्यास किंवा साठवण्यास मदत करतात. एक उदाहरण घ्यायचे झाले तर इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.

स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्यानंतर स्वादुपिंडातील असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ होते, अनेकदा ती स्वादुपिंडाच्या नलिकांमध्ये सुरू होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे नेमके कारण अज्ञात आहे, पण काही घटक जोखीम वाढवण्यासाठी ओळखले जातात. त्यामध्ये वाढते वय, सिगारेट ओढणे, जास्त चरबीयुक्त आहार, मधुमेह आणि जवळच्या नातेवाइकांमधील रोगाचा कौटुंबिक इतिहास यांचा समावेश होतो.

कर्करोगास सुरुवात झाल्यानंतरचे बदल

शरीरात नियमितपणे सामान्य पेशी वाढतात आणि विभाजित होऊन नवीन पेशी तयार करतात कारण शरीराला त्यांची गरज असते. जेव्हा सामान्य पेशी जुन्या होतात किंवा खराब होतात तेव्हा त्या मरतात आणि नवीन पेशी त्यांची जागा घेतात. स्वादुपिंडामध्ये शरीराला त्यांची गरज नसणाऱ्या नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या किंवा खराब झालेल्या पेशी त्या मरत नाहीत. अतिरिक्त पेशी तयार केल्याने गाठ तयार होते.

World Cancer Day
Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

स्वादुपिंडातील निर्माण होणाऱ्या गाठी कर्करोगाच्या आणि सामान्य दोन्ही प्रकारच्या पाहायला मिळतात. सामान्य गाठी त्रासदायक नसतात. कर्करोगाच्या गाठी जीवघेण्या असतात. स्वादुपिंडातील कर्करोगाच्या गाठी काढल्या जाऊ शकतात. परंतु पेशी परत वाढून गाठी पुन्हा तयार होतात. जवळपासच्या ऊती आणि अवयवांवर आक्रमण करू शकतात आणि नुकसान करू शकतात तसेच शरीराच्या इतर भागात कर्करोग पसरू शकतो.

स्वादुपिंडाचा कर्करोग इतर पेशींवर आक्रमण करू शकतो. त्यामुळे जवळचे अवयव आणि पेशीमध्ये कर्करोगाची वाढ होऊ शकते. कर्करोगाच्या पेशी स्वादुपिंडामधून बाहेर पडून शेजारच्या निरोगी पेशींवर आक्रमण करतात. त्यानंतर त्याचा प्रसार झपाट्याने होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शेजारील निरोगी पेशींना देखील नुकसान पोहोचते.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे सहसा लक्षात येत नाहीत. ती इतर आजारांशी संबंधित असू शकतात. स्वादुपिंडाच्या सुरुवातीच्या कर्करोगात अनेकदा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यामुळे निदान आणि उपचार करणे कठीण होते. स्वादुपिंडाची गाठ मोठी होईल तसे एक किंवा अधिक सामान्य लक्षणे दिसू शकतात.

World Cancer Day
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

पोटदुखी आणि पाठदुखी ः पोट किंवा पाठीच्या मध्यभागी सतत वेदना होणे सामान्य आहे. हे बहुतेकदा ट्यूमरच्या आसपासच्या अवयवांवर आणि मज्जातंतूंवर दाबल्यामुळे होते. हे लक्षण सामान्य आहे आणि बऱ्‍याचदा दुर्लक्षित केले जाते.

कावीळ संबंधित लक्षणे ः स्वादुपिंडाच्या गाठी अनेकदा पित्त नलिकेत अडथळा निर्माण करतात आणि बिलीरुबिन वहन होण्यात अडचण होऊन काविळीची लक्षणे दिसायला चालू होतात.

मळमळ आणि उलटी ः गाठीमुळे पोटावर दाबू पडून अडथळा निर्माण झाल्याने अन्न जाणे कठीण होते. या अडथळ्यामुळे वेदना, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

वजन कमी होणे किंवा भूक न लागणे ः स्वादुपिंडाच्या कर्करोगात अनपेक्षित किंवा तीव्र वजन कमी होणे सामान्य आहे. अनेकदा भूक न लागणे हे लक्षण दिसते. अपचन, मळमळ ही लक्षणे दिसू शकतात.

World Cancer Day
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

निदान करण्यासाठी तपासण्या

रक्त किंवा इतर प्रयोगशाळेच्या चाचण्या निदान करण्यासाठी आवश्यक आहेत. शारीरिक तपासणी स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय आणि प्लीहा याची हाताने तपासणी. सिटी स्कॅन, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड चोलॅन्जिओपॅन क्रिएटोग्राफी (ERCP), एम आर आय, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी स्कॅन), नीडल बायोप्सी, लॅपरोस्कोपी या तपासण्या निदान करण्यासाठी वापरल्या जातात.

उपचार

उपचारामध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडीएशन, औषधी उपचार केले जातात. यासोबत आयुर्वेदामधील देखील अनेक औषधे स्वादुपिंडाच्या कर्करोगामधील लक्षणे कमी करण्यास फायदेशीर आहेत.

स्वादुपिंडाच्या कर्करोगात आहार

वजन नियंत्रणात ठेवण्यास योग्य आहार असणे आवश्यक आहे, तसेच भूक नसल्यामुळे नियंत्रित आहार असावा. अन्न व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे फळभाज्या, पालेभाज्या यांचा वापर करावा,

टाळावयाचे पदार्थ ः उच्च चरबीयुक्त पदार्थ, मांस, चीज, फास्टफूड, तळलेले पदार्थ, तेल, बाहेरील खाद्यपदार्थ, मसालेदार पदार्थ, उच्च फायबरयुक्त पदार्थ, उत्तेजक द्रव्ये, चहा- कॉफी.

विहार ः नियमित व्यायाम आणि योगासने याचा सराव करावा. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी चालणे हा व्यायाम खूप लाभदायक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com