
Akola News : जिल्ह्यासह या भागातील इतर जिल्ह्यांत वनौषधी, पानमळे केले जातात. या पिकांना पीकविम्याच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे, अशी मागणी मंगळवारी (ता.१४) झालेल्या औषधी वनस्पती व शेतकरी विकास अभियान विभागीय समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली.
अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीची बैठक झाली. या वेळी समितीचे विभागातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत सदस्यांनी पानपिंपरी, विड्याचे पानमळे व सफेद मुसळीला पीकविम्याच्या कक्षेत आणावे. इतर पिकांसाठी जसे ट्रिगर लावले जातात, ते निकष या पिकांना लावून तातडीने उपाययोजना करावी. शासनाने ‘मनरेगा’मध्ये पान पिंपरीचा समावेश केला आहे.
सद्यःस्थितीत पानपिंपरीची लागवड चालू आहे. ही लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘मनरेगा’चा फायदा व्हावा, यासाठी अनुदानाच्या हेतूने प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जावी, असेही सदस्यांनी सुचवले.
अकोला जिल्ह्यात ३०० हेक्टरवर क्षेत्र
तेल्हारा, अकोट तालुक्यांत पानपिंपरी, सफेद मुसळी, पानवेलीची लागवड केली जाते. हे क्षेत्र किमान ३०० हेक्टरपेक्षा अधिक आहे. यात प्रामुख्याने मागील काही वर्षांत पानपिंपरीची लागवड वाढली आहे. २०२१-२२ च्या हंगामात जिल्ह्यात २७२ हेक्टर क्षेत्रावर पानपिंपरीची लागवड झाली होती.
जिल्ह्यात २०१९ पासून तर २०२१-२२ या वर्षापर्यंत सुमारे ७५० हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली आहे. अशाच प्रकारे ५० ते ६० हेक्टरदरम्यान सफेद मुसलीचीही लागवड केली जाते. पानवेलीसाठी हा भाग प्रसिद्ध होता. कालांतराने पानवेलीचे क्षेत्र आता खूप कमी झाले आहे. शासकीय नोंदीनुसार हे क्षेत्र १० हेक्टरच्या आत आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.