पालकत्व एक कला

प्रत्येक बालकात एक गोजिरवाणं फुलपाखरू असतं. त्याला मुक्त संचार करायचा असतो. बागडायचं असतं. पण निरीक्षण केलं तर असं जाणवतं की, ही कुटुंब व्यवस्था, समाज त्याचं ते स्वातंत्र्य हिरावून घेतंय.
Parenting
ParentingAgrowon

परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. बालरुपात तो आनंदाने सगळीकडे वावरतो. आपल्या मुली आणि मुलांनी आपली आई-वडील म्हणून निवड केली. हे आपलं भाग्य. जन्माच्या आधीपासून ते जन्मल्यानंतर आणि पुढेही त्यांचे सर्वांगाने पालन पोषण करणे, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहून आणि त्याहीपुढे, पालक म्हणून प्रत्येकजण आपापल्यापरीने जबाबदारी पार पाडत असतात. खरं तर पालकत्व ही एक कला आहे. एक सुंदर असे शास्त्र आहे. शोभा भागवत यांचे ‘सारं काही मुलांसाठी’ हे पुस्तक सर्वच पालकांनी, शिक्षकांनी आवर्जून वाचायला हवं. त्यात त्यांनी अगदी सहजरीत्या पालकांनी आपल्या लेकरांशी नेमकं कसं वागावं हे सांगितलंय. त्या म्हणतात की, पालक नावाचा आड जिवंत झऱ्‍यांनी भरलेला हवा. (Parenting Is an Art)

प्रत्येक बालकात एक गोजिरवाणं फुलपाखरू असतं. त्याला मुक्त संचार करायचा असतो. बागडायचं असतं. पण निरीक्षण केलं तर असं जाणवतं की, ही कुटुंब व्यवस्था, समाज त्याचं ते स्वातंत्र्य हिरावून घेतंय. यामुळे ही फुलं कोमेजत आहेत. त्यात भर म्हणजे खूप कमी वयात अगदी अडीच वर्षाच्या बाळाला अभ्यास यावा हा पालकांचा अवाजवी हट्ट आहे. ज्या वयात या लेकरांनी माती खेळावी, बडबडगीत म्हणावीत, गोष्टी ऐकाव्यात, त्या वयात पेन्सिल, वही हातात ठेवली जाते. त्यांची बोटही पुरेशी तयार नसतात. आणि मग मारून, मुटकून रडत, कढत,त्यांना शाळेत जावं लागतं.

Parenting
मशागत की शून्य मशागत?

शोभाताई क्वालिटी टाइम’बद्दल म्हणतात की, क्वालिटी टाइम देणं याचा अर्थ मूल त्या वेळेत आनंदी असणं. आणि पालकांनी सततच त्याच्यासोबत असणं, असं नव्हे तर त्याला स्वातंत्र्य देणं, त्याला जे आनंदानं करावसं वाटतं त्यासाठी त्याला सवड देणं. आपणही ही पाच वाक्यं मुलांना सांगतो का?

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू हे किती छान केलंस. तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं. सॉरी बरं का! माझ्या लक्षातचं नाही आलं. आपले आई-बाबा आपल्याला सॉरी म्हणतात मग आपलं काही चुकलं तर आपणही ती चूक मान्य करून माफी मागायला हवी, ही भावना आपोआपच बालकांमध्ये रुजवली जाते.

मोठ्यांकडूनही चुकतं मग आपलं चुकलं तर आपण मोकळ्या मनाने आई-बाबांना सांगावं. हे ही त्यांना या छोट्याशा कृतीतून पटतं. बालकांना निसर्गाशी मैत्री करायला आवडते. निसर्गातील घटकांचं निरीक्षण करायला त्यांना जास्त आवडतं. आणि खेळता खेळता, निरीक्षणातून, कृतीतून आपोआपच त्यांना ज्ञान मिळत असतं. एक पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण बालकांसाठी असं वातावरण तयार केलं तर... त्या वातावरणात ही गोजिरवाणी फुलं मनसोक्त फुलतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com