सुखी जीवनाचा पासवर्ड

प्रत्येकालाच सुख हवं असतं. सुखासाठी वाटेल ते करणारी मंडळी आपण पाहतो. सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. पण खरं सुख म्हणजे नेमकं काय, हा प्रश्‍न आपण कधी स्वतःला विचारला का?
Happy Life thoughts in Marathi, Good Thoughts
Happy Life thoughts in Marathi, Good ThoughtsAgrowon

ज्योती आधाट/तुपे

प्रत्येकालाच सुख हवं असतं. सुखासाठी वाटेल ते करणारी मंडळी आपण पाहतो. सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. पण खरं सुख म्हणजे नेमकं काय, हा प्रश्‍न आपण कधी स्वतःला विचारला का? खरं सुख बाहेर कशातच नसून आपल्या मनात, हृदयात आहे. आणि या हृदयातल्या सुखाची ओळख आपल्याला करून देतात ते आपले गुरू.

ओशो म्हणतात, की गुरू आणि शिक्षक यांमध्ये फरक आहे. शिक्षक ज्ञान देतात. या उलट गुरू तुम्हाला अज्ञानी बनवतात. कारण परम अज्ञानी अवस्था प्राप्त झाल्याशिवाय परमात्मा दिसू शकत नाही. गुरू आणि शिक्षकामध्ये हा मुळापासूनच भेद आहे. मला एखादी गोष्ट माहिती आहे यापेक्षा मोठा अहंकार नाही. जे आपल्याला माहिती असतं ते मुळातच इतरांकडून आपल्याला माहिती होत असतं. तरीही आपण ते ज्ञान मी निर्माण केलं असं समजून वावरतो. आणि हे मीपणाचं ओझं आयुष्यभर मनावर ठेवून वावरतो. परमेश्‍वर बुद्धी देतो तेव्हा आपण चार गोष्टी चांगल्या करतो. तो तसं करण्याची सद्‍बुद्धी आपणाला देत असतो. आणि या गोष्टी भावनेच्या पातळीवर जाणून घेतल्या तरच समजतात.

सुकरात म्हणतात, की मी काहीही जाणत नाही याचा अनुभव होणं म्हणजे शिष्य होण्याची क्षमता निर्माण होणं.

गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा म्हणतात. आदरणीय राऊत सर म्हणतात, की वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी रेषा तिला आपण व्यास म्हणतो. ही झाली गणिताची भाषा. जर आपल्या शरीराचे हृदय हे केंद्र मानलं तर, माझ्या हृदयापर्यंत जो कोणी पोचतो आणि आरपार जातो, तो ही माझ्यासाठी गुरू ठरतो. लपलेला अर्थ हा आहे व्यासपौर्णिमेचा. माझ्या हृदयापर्यंत तो नेमकं काय पोहोचवतो. आणि मी त्यातून नेमकं काय घ्यावं हे महत्त्वाचं.

खरंच सुखी जीवनाचा पासवर्ड गुरू आहे. जर त्यातले खरे मर्म जाणले, तर मनःशांती नक्कीच लाभेल. आणि जीवन जगण्याची दिशा मिळणार आहे. भक्त पुंडलिकाला देव भेटायला आले तरी ते पांडुरंगाला थांबण्यास सांगतात. आधी आई -वडिलांची सेवा करतात. आणि देवही आपल्या भक्ताची वाट पाहत थांबतो. कारण पुंडलिकाची निस्सीम भक्ती देवाला माहिती आहे. पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांना गुरू मानलंय.

संत कबीर म्हणतात, की गुरू गोविंद दोऊ खडे, काको लागूं पाय। म्हणजे गुरु आणि गोविंद सोबत आल्यावर नेमकं आधी कुणाच दर्शन घ्यायचं? तर आधी गुरूंचे दर्शन घ्यायचं. कारण गुरूंनी भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. म्हणून आधी गुरूंचे दर्शन घ्यावं.

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा। आम्ही चालवु हा पुढे वारसा।।

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com