Honey Update : पाटगावमध्ये मिळणार मधू पर्यटनातून रोजगार

Madhu Tourism : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव (ता. भुदरगड) येथे होत असलेल्‍या ‘मधाचे गाव पाटगाव’ उपक्रमामुळे भविष्यात मधू पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळेल.
Honey Village
Honey VillageAgrowon

Madhu Tourism Kolhapur News : ‘‘कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव (ता. भुदरगड) येथे होत असलेल्‍या ‘मधाचे गाव पाटगाव’ उपक्रमामुळे भविष्यात मधू पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळेल. त्यातून गाव स्वावलंबी होईल.

तसेच पाटगाव हे मधमाशी पालनासाठी देशातील सर्वोकृष्ट गाव होऊन हा उपक्रम देशातील पथदर्शी उपक्रम ठरेल’’, असा विश्‍वास महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांनी व्यक्त केला.

पाटगाव येथे सिन्हा व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ‘मधाचे गाव पाटगाव’ या अभिनव उपक्रमांतर्गत होणाऱ्या कामाची पाहणी केली. यामध्ये पाटगाव येथील ग्रामपंचायत इमारत व विविध घरांचेही मधमाश्‍यांच्या थीमवर सुशोभीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या पहिल्या मजल्यावरील बाजूस माहिती व प्रशिक्षण दालनाची पाहणी त्यांनी केली.

सिन्हा म्हणाल्या, ‘‘तरुणांना, मधपाळांना मधाबरोबरच मधाचे पराग, रॉयलजेली, मेण अशी मौल्यवान उत्पादने तयार करून त्यापासून रोजगार मिळेल.’’

Honey Village
Processed Honey Products : मध प्रक्रियायुक्त उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी

रेखावार म्हणाले, ‘‘खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने ‘मधाचे गाव पाटगाव’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात सर्व प्रकारच्या शासकीय यंत्रणा एकत्र करून हा उपक्रम राबविण्यात येईल.’’ रेखावार यांनी कृषी व वन विभागाला मधमाशांसाठी लागणारी झाडे, पिके लागवड करण्याचे तसेच त्याबाबतच्या आराखड्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

मौनी महाराज मठात एक आकर्षक असा सेल्फी पाइंट लावण्यात आला आहे. ‘मधमाशी वाचवा’ हा संदेश पाटगावच्या घराघरांत कोरला गेला आहे. या सोबत १०० मधपाळांना बी ब्रीडिंग प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील टप्प्यात पाटगाव येथे मध संकलन, मध प्रक्रिया, मेणपत्रा प्रक्रिया प्रशिक्षण व मधुबन यासाठी स्वतंत्र सामूहिक सुविधा केंद्राची तरतूद केली.

मधपाळ, ग्रामस्थ, महिलांचा मेळावा

दरम्यान, पाटगाव परिसरातील मधपाळ, ग्रामस्थ, महिला यांचा पाटगाव येथील दत्त मंदिरात मेळावा झाला. या वेळी मध संचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, सामाजिक वनीकरणाच्या उपवनसंरक्षक उज्ज्वला पवार, गट विकास अधिकारी एस. एम. गावडे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, संदेश जोशी, दत्तात्रेय कुरुंदवाडे आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com