Stormy Rain : वादळी पावसाचे केंद्र बनले पातूर तालुका

Hailstorm : या वर्षात मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीचे केंद्र पातूर तालुका झाल्याचे एकूणच चित्र तयार झाले आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Akola News : या वर्षात मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीचे केंद्र पातूर तालुका झाल्याचे एकूणच चित्र तयार झाले आहे. दोन महिन्यांत पाच ते सहा वेळा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीट (Hailstorm) या तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात झाले. याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात फलोत्पादनात पातूर, अकोट हे तालुके अग्रेसर आहेत. पातूरमध्ये शेतीत प्रयोगशिलता अधिक जोपासली जात आहे. फळ, फूल, भाजीपालावर्गीय पिकांचे क्षेत्र मोठे आहे. आता याच तालुक्यात नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

यंदा उन्हाळ्यातही पाऊस येत आहे. मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत पाच ते सहा वेळा पावसाने धुमाकूळ घातला. सलग पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्यात २६ व २७ एप्रिलला जिल्ह्यात पातूर, बाळापूर व बार्शीटाकळी या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे ५६ गावात तीन हजार ६६५ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

त्यानंतर २८ ते ३० एप्रिलदरम्यान झालेल्या पावसामुळे अकोट, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ९०० हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे कामे सुरू आहेत.

Rain Update
Crop Damage Hailstorm: वादळी वाऱ्यामुळे आंबा बागांचं नुकसान

मार्च महिन्यात ६ ते ९ मार्च आणि १५ ते १९ मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे फळबागा व रब्बीतील गव्हासह अन्य पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा अवकाळी पावसाने झोडपले.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे ९ हजार २६८.६८ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. दरम्यान एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला.

त्यात २६ व २७ एप्रिल रोजी पातूर, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यात पाऊस झाल्याने तीन हजार ६६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान एकट्‍या पातूर तालुक्यात झाले.

याव्यतिरिक्त २८ ते ३० एप्रिल दरम्यान ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २६ व २७ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा पातूर तालुक्यातील ३१ गावांना फटका बसला. तीन हजार २३.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात गहू, कांदा, लिंबू, टरबूज व इतर पिकांचा समावेश आहे.

सातत्याने सर्वेक्षणाचे काम

गेल्या दोन महिन्यांत पाठोपाठ नैसर्गिक आपत्ती येत असल्याने सर्वेक्षणाचे काम निरंतर सुरू आहे. एका आपत्तीचे पंचनामे होत नाहीत तोच पुन्हा दुसरी आपत्ती तयार राहते. यामुळे एका पाठोपाठ पंचनामे करून अहवाल सादर करावे लागत आहेत. कर्मचारी या कामांमध्येच अधिक व्यस्त राहत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com