
Kolhapur News : महावितरणतर्फे (Mahavitaran) कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील प्रलंबित २०४४ वीज जोडण्यांचे (Electricity Connection) काम ३१ मार्च २०२३ अखेर करण्यात येणार आहेत. तशा सूचना कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांनी केली आहे. त्यासाठी राज्य पातळीवर पंधराशे कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.
महावितरणने शेती पंपांच्या वीज जोडण्यांचा प्रश्न निकालात काढण्यासाठी अग्रक्रम दिला आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ४ हजार ८८७ शेती पंप ग्राहकांनी पाच वर्षांहून अधिक काळ एकही वीज बिल भरलेले नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे.
या थकबाकीचा आकडा ७५ कोटी रुपये इतका आहे. या स्थितीत शेती पंपांच्या वीज जोडण्यांचा प्रश्न चर्चेत आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील प्रलंबित वीज जोडण्यांचा प्रश्न लवकर निकाली लागावा, यासाठी संघटना पाठपुरावा करत आहेत. त्यातच वीज मीटरची दरुस्ती न झाल्याने बिल का पाठवले जाते, असा प्रश्न विचारला जात आहे.
प्रलंबित वीज जोडण्या तत्काळ करा, अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, शेती पंपांना दिवसा वीज मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राबवली जात आहे.
पहिल्या टप्प्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३८५ मेगावॅटचा शेतीचा वीज वापर सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे कार्यान्वित करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून गतीने पूर्ण करावी, असेही भादीकर यांनी स्पष्ट केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.