Agriculture Pump Electricity Supply : हिंगोली जिल्ह्यात ४ हजार ९८२ कृषी पंपाची वीज जोडणी प्रलंबित

Agriculture Pump : महावितरण अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांत २०२२-२३ या वर्षात एकूण १ हजार ३१४ कृषिपंपांना वीजजोडण्यात देण्यात आल्या तसेच २८७ सौरकृषीपंप देण्यात आले.
Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon

Agriculture Pump Hingoli News : महावितरण अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांत २०२२-२३ या वर्षात एकूण १ हजार ३१४ कृषिपंपांना वीजजोडण्यात देण्यात आल्या तसेच २८७ सौरकृषीपंप देण्यात आले. परंतु मार्च (२०२३) अखेर सर्व तालुक्यांतील ४ हजार ९८२ कृषी पंपांच्या वीज जोडण्या प्रलंबित राहिल्या आहेत.

गतवर्षी (२०२२) मार्च अखेरपर्यंत हिंगोली जिल्ह्यात महावितरण अंतर्गंत लघुदाब कृषी पंपाच्या ग्राहकांची संख्या ७७ हजार १९१ होती. त्यात हिंगोली तालुक्यातील १३ हजार ३८६, कळमनुरी १३ हजार ९५४, वसमत २१ हजार ७८१, औंढा नागनाथ १२ हजार ४६६, सेनगाव १५ हजार ६०४ कृषीपंपाचा समावेश आहे.

Agriculture Pump
Agriculture Pump Electricity Supply : सोलारपूर जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार कृषिपंपांना वीजजोडणी

मुख्यमंत्री सौरकृषीपंपाची एकूण संख्या ४ हजार ६९५ आहे. त्यात हिंगोली तालुक्यातील ९७२ सौरकृषीपंप, कळमनुरी मधील१ हजार १२, वसमत मधील १ हजार ११४, औंढा नागनाथ मधील ८०९, सेनगाव तालुक्यातील ७८८ सौरकृषीपंप आहेत.

एप्रिल २०२२ पर्यंत लघुदाब कृषिपंपासाठी ५ हजार १८५ शेतकऱ्यांनी तर सौर कृषिपंपासाठी २८७ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. २०२२-२३ या वर्षात १ हजार २४८ शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी सुरक्षा अनामत रक्कम भरली. एकूण १ हजार ३१४ कृषिपंपांना वीजजोडण्यात देण्यात आल्या, असे सूत्रांनी सांगितले.

कृषी पंप वीज जोडणी प्रलंबित स्थिती

तालुका - कृषी पंप संख्या

हिंगोली- १३४८

कळमनुरी - १२५१

वसमत - ३२२

औंढा नागनाथ - १९८

सेनगाव- १८६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com